कोल्‍हापूर : पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन

गटार बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंदगड पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या एका कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. चंद्रकांत ज्ञानू लोखंडे (वय-41) असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  कंत्राटदार अभियंता लोखंडे याने तक्रारदाराकडे गटार बांधकामाचे बिल काढण्यासाठी 6000 रुपयांची मागणी केली होती.याप्रकरणी मिळालेल्या माहितीची खात्री करुन लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि लोखंडेला रंगेहात अटक केले. मात्र लोखंडे अचानक बेशुद्ध पडल्यामुळे कारवाईला उशीर होत आहे.