सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला चोप

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन चोप दिला. अक्षय तांबवेकर असे या तरुणाचे नाव आहे.

पवार कुटुंबामध्येच ईव्हीएम विषयी उलटसुलट मते आहे. त्याच्या बातम्या मंगळवारी दिवसभर टीव्ही चॅनेलवर सुरु होत्या. ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी त्यात केले होते. या विषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती. त्याखाली कॉमेंट करताना अक्षय याने सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. ही गोष्ट समजताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याला शोधत घरी गेले. त्याला चोप दिला.
मारहाण करुन कार्यकर्ते थांबले नाही तर, त्यांनी अक्षयला कॅमेरासमोर आणि लेखी माफी लिहून घेतली. सोशल मिडियावर केलेल्या चुकीच्या पोस्टबद्दल जाहीर माफी मागत आहे, असे लिहून घेतल्यावर त्याला सोडून देण्यात आले.

याचा एक व्हिडिओ यु-ट्युबवर टाकण्यात आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचलेले व त्याला कॉमेंटबद्दल जाब विचारत असल्याचे आणि त्यानंतर त्याला मारहाण केल्याचे दिसत आहे.

यावर भाजपने सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. ‘घरात घुसून ठोकून काढीन’ सुप्रिया सुळे आपल्या शब्दाला जागल्या. बोले तैसा चाले, अशी पोस्ट करत महाराष्ट्र भाजपने ट्विट केलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like