Kondhwa Pune Crime | कोंढवा : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला कोयत्याने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kondhwa Pune Crime | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयत्याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.14) सायंकाळी साडेपाच वाजता अलिफ टॉवर येथे घडला आहे. याबाबत शमशाद मोहमंद अहसान कादरी (वय-19 रा. अलिफ टॉवर जवळ, कोंढवा) याने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी रिहान खान, अमिन खान, हुसेन काचवाला, अब्बास काचवाला, बुरानुद्दीन काचवाला यांच्यासह इतर पाच ते सात जणांवर आयपीसी 326, 143, 147, 148, 149, 323 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद तरुणाचे व आरोपींचे पूर्वी वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी मित्रासोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी परिसरात दहशत निर्माण करुन फिर्यादीच्या पायावर कोयता मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

मिरवणुकीत नाचल्याने मारहाण

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचल्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.14) रात्री पावणे नऊच्या सुमारास शनिवार पेठेतील (Shaniwar Peth Pune) फुटका बुरुज चौकात घडली. याबाबत प्रेम सचिन गायकवाड (वय-22 रा. दांडेकर पुल) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे.

यावरुन पॅडी उर्फ प्रथमेश मस्के, प्रणय तापपेरे, सुनिल जोगदंड, ओम जोगदंड, ओण पालखे उर्फ कानाड्या, प्रणव सुतकर,
आदित्य जोगदंड, रोहन ओव्हाळ, सुमित दहिभाते (सर्व रा. दांडेकर पुल) यांच्यावर आयपीसी 323,143, 147,149, 504
नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रेम गायकवाड व त्याचे मित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
अजिंक्य भीमज्योत सेवा संघ मंडळाच्या मिरवणुकीत नाचण्याकरीता गेले होते. त्यावेळी प्रथमेश मस्के याने फिर्यादी
व त्यांच्या मित्रांना मिरवणुकीत कशाला नाचला अशी विचारणा करुन शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज