Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Accident News | चाकण औद्योगिक परिसरात (Chakan MIDC) वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हा चिंतेचा विषय ठरत आहे. चाकण परिसरात दररोज एक ते दोन अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सोमवारी (दि.15) मोहीतेवाडी गावाच्या (Mohitewadi) हद्दीमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.(Pimpri Accident News)

नौशाद अन्सारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अन्सारी यांचा भाचा मोहम्मद आरफीन अन्सारी (वय-18 रा रा. घाटकोपर, मुंबई मुळ रा. पेदा. ता.जि. बिजनोर) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ट्रक चालक हसनखान सुभानखान पठाण (वय-31 मादणी डोणगाव ता. मेहकर) याच्यावर आयपीसी 279, 338, 337, 304(अ), 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी यांचे मामा नौशाद अन्सारी हे स्कुटीवरुन चाकण-शिक्रापूर रोडने चाकण येथे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एमएच 12 क्य.जी 8547) नौशाद यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना ट्रकची धडक नौशाद यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये नौशाद यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने व निष्काळजीपणे वेगात चालवून फिर्यादी यांच्या मामांना धडक दिली.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नौशाद अन्सारी यांचा मृत्यू झाला.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा

Lohegaon Pune Crime | पुणे : प्रेसंबंधाच्या संशयावरुन मारहाण, चारचाकी गाडीची तोडफोड

Bridegroom Suicide In Talegaon Dabhade | पिंपरी : खळबळजनक! लग्नादिवशीच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल, लग्नमंडपात शोककळा