Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mahavikas Aghadi (MVA) | येत्या गुरुवारी (दि. १८) पुण्यात महाविकास आघाडीची भव्य प्रचारसभा होत आहे. या सभेला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरूरचे (Shirur Lok Sabha) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे याच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असून त्यानिमित्ताने मविआची ही सभा होत आहे. या निवडणुकीत पुण्यात होणारी ही पहिलीच मोठी जाहीर सभा आहे.(Mahavikas Aghadi (MVA))

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून थोड्या अंतरावर मविआची ही पहिली जाहीर प्रचार सभा ११ वाजात होईल. या सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे संजय राऊत (Sanjay Raut), आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi party (AAP) प्रदेशाध्यक्ष अभिजित फाकटे संबोधित करणार आहेत.

बारामती लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभेचे डॉ. अमोल कोल्हे आणि
पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, हे तीनही उमेदवार गुरुवारी सकाळी १० वाजता आपले उमेदवारी
अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करतील, अशी माहिती धंगेकर यांचे प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी
यांनी दिली. त्यानंतर प्रचाराची पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेत मविआचे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे मावळ मतदारसंघातील (Maval Lok Sabha) शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय निगडी प्राधिकरणात उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा

Lohegaon Pune Crime | पुणे : प्रेसंबंधाच्या संशयावरुन मारहाण, चारचाकी गाडीची तोडफोड

Bridegroom Suicide In Talegaon Dabhade | पिंपरी : खळबळजनक! लग्नादिवशीच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल, लग्नमंडपात शोककळा