Konica Layak | सोनू सूदने रायफल गिफ्ट दिलेल्या राष्ट्रीय नेमबाज ‘कोनिका लायक’ची आत्महत्या

रायपूर : वृत्तसंस्था – झारखंडची (Jharkhand) स्टेट चॅम्पियन शूटर कोनिका लायक (Konica Layak) हिने गळफास (hanging) घेत आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये स्टेट चॅम्पियन विजेत्या कोनिकाचा मृतदेह महिलांच्या वसतीगृहात (Women hostel) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मागील चार महिन्यात भारतीय शूटरच्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे. कोनिका लायक Konica Layak (वय-26 रा. धनबाद, झारखंड) हीला सोनू सूदने प्रशिक्षणासाठी रायफल भेट दिली होती. त्यानंतर ती चर्चेत आली होती. तिच्या निधनामुळे क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे.

 

माजी ऑलिम्पियन आणि ‘अर्जुन’ पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक जयदीप कर्माकर (Jaideep Karmakar) यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे नेमबाजीचे प्रशिक्षण (Shooting training) घेत होती. कोनिकाने (Shooter Konica Layak) वसतीगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. कोनिका पूर्वी जुन्या रायफल वापरायची. त्या रायफली तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या असायच्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती त्याच जुन्या रायफलने शूटिंग करत होती. यानंतर जेव्हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला तिच्याबद्दल समजले तेव्हा त्याने तिला मार्च महिन्यात एक नवीन रायफल भेट दिली होती.

प्रशिक्षक जयदीप यांनी कोनिकाला उत्तम प्रशिक्षणासाठी कोलकाता येथील शूटिंग अकादमीत (shooting academy) नेले होते.
अकादमी व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा दिवसांपासून कोनिका (Konica Layak) प्रशिक्षणासाठी फार कमी वेळा सत्रात सहभागी होत होती.
कर्माकर यांनी तिची आत्महत्या खूपच धक्कादायक असल्याचे म्हटले. पूर्वी ती तिचा व्यायाम व्यवस्थित करत होती.
परंतु गेले काही दिवस ती प्रशिक्षण सत्रात अनियमितपणे येत होती. याचे कारण माहित नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Konica Layak | National Shooter Konika Layak commits suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Esha Gupta Hot Bathroom Video | ईशा गुप्तानं बाथरूममध्ये बनवला Video, बिकिनीमध्ये हॉट फिगर पाहून फॅन्स म्हणाले – ‘मौज करा दी…’

Rashami Desai-Umar Riaz | रश्मी देसाई म्हणाली ‘I Love You’, तर घाबरलेला उमर म्हणाला…

Vehicle Registration Certificate | कारचे RC हरवले असेल तर ‘नो-टेन्शन’? जाणून घ्या ‘डुप्लीकेट’ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तयार करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत

Sachin Tendulkar | मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिला विराट कोहलीला चांगलाच दणका, जाणून घ्या प्रकरण