Kriti Sanon | “तुझे लग्न होणार नाही..”, अभिनेत्री क्रिती सेनॉनने सांगितले बॉलीवुडच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव, स्टार किड्समुळे…

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिने बॉलीवुडमध्ये अभिनयाच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज अभिनेत्री क्रिती सेनॉन ही बी-टाऊन (Bollywood News) मधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मात्र बाहेरुन या इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या अभिनेत्री क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) हा प्रवास अत्यंत खडतर होता. पदार्पणात स्टार किड्समुळे क्रितीला खूप त्रास सहन करावा लागला.

अभिनेत्री क्रिती सेनॉन ही आता अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसते. क्रितीच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर चित्रपटांमार्फत पडली आहे. तिने शाहरुख (SRK), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), अक्षय कुमार (Akshay Kumar) अशा अनेक हिरोंसोबत काम केले आहे. मात्र तिच्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात करणे अतिशय अवघड होते. (Kriti Sanon Struggle Period) नातेवाईकही क्रितीला सुनावत होते. एका मुलाखतीदरम्यान क्रितीने सांगितले की, ‘जेव्हा मी इंडस्ट्रीत येण्याचा विचार केला तेव्हा माझ्या नातेवाईकांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की मला वाटत नाही की हे आपल्या येथे चालेल. हे खूप मोठे स्वप्न आहे. ही इंडस्ट्री वाईट आहे. येथे आधीच संघर्ष करणारी खूप लोकं आहेत, यामुळे तुझे लग्न देखील लवकर होणार नाही.” असे नातेवाईकांनी क्रितीला सुनावले होते.

पुढे ती म्हणाली की, “जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईमध्ये (Mumbai) आले मी एकदम गोंधळून गेले होते. मला काहीच कळत नव्हतं कशी सुरुवात करु, कोणाला भेटू, कोणाला संपर्क साधावा हेच कळत नव्हते. मी या इंडस्ट्रीमध्ये कोणालाच ओळखत नव्हते. जर मला काही सिनेविश्वाची बॅकग्राऊंड असती तर कदाचित हे लोक मला आधीपासून ओळखत असते. अनेकवेळा असे होत होते की भूमिका मला मिळणार अशी शक्यता तयार व्हायची मात्र कोणत्या तरी स्टार किड्समुळे (Bollywood Star Kids) मला नाकारले जायचे. अनेक स्टारकिड्समुळे मला रिप्लेस करण्यात आले. पण का करण्यात येत होते यामागचे काहीही कारण मला सांगितले जात नव्हते. मला माहित नव्हते मी का रिप्लेस होत आहे. सुरुवातीच्या काळात अशा घटनांमुळे तुमची थोडी चिडचिडही होते” अभिनेत्री क्रिती सेनॉनने एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल पिरियड मधील बॉलीवुडबद्दलचा अनुभव सांगितला. या इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणे किती कठीण आहे या बद्दल सांगितले.

अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. तिने हिरोपंती (Heropanti) चित्रपटातून 2014 साली बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती लुक्का छुपी (Lukka Chupi), मीमी (Mimi), दिलवाले (Dilwale), हाऊसफुल (Housefull) या हिट चित्रपटांमध्ये ही झळकली. तिचा नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपट (Adipurush Movie) देखील प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने क्रितीला ट्रोल करण्यात आले. लवकरच क्रिती टायगर श्रॉफ सोबत ‘गणपथ’ (Ganapath – Part 1) चित्रपटामध्ये झळकणार आहे. अभिनयाबरोबरच क्रिती सेनॉन निर्मिती क्षेत्रात उतरली असून तिने ‘ब्लू बटरफ्लाय’ (Blue Butterfly) हे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे.

Web Title :  Kriti Sanon | kriti sanon struggle life initial days was replaced in movie because of starkids

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून घरफोडी करणार्‍याला अटक, डान्सरच्या घरावर मारला होता डल्ला, पोलिसांकडून 12 लाखाचा ऐवज जप्त

Uday Samant on Uddhav Thackeray | ‘हॉस्पिटलमध्येच किती मीटींग झाल्या, मला पण सांगवं लागेल…’, उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Pune PMC – JICA project | ऍग्रीकल्चर कॉलेजने जागा न दिल्याने जायका प्रकल्पातील एका एसटीपीचे काम रखडले