Uday Samant on Uddhav Thackeray | ‘हॉस्पिटलमध्येच किती मीटींग झाल्या, मला पण सांगवं लागेल…’, उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uday Samant on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिंदे गटावर (Shinde Group) हल्लाबोल केला. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) कार्यक्रम सुरु होता. तसेच मध्यंतरी अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील झाले. काही लोकांना हे किती झोंबलय हे काल समजलं, असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Uday Samant on Uddhav Thackeray)

 

उदय सामंत म्हणाले, काही लोकांना पोटशूळ उठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) व्यक्तीमत्त्वाचा विचार केला तर त्यांना गर्दीत जाऊन काम करण्याची सवय आहे. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचाही तोच स्वभाव आहे. पण ज्यांना गर्दी बघून काम करण्याची (Maharashtra Politics News) सवय नाही. त्यांना हे समजणार नाही. काल झालेल्या भाषणात हीन दर्जाची टीका झाली हे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Uday Samant on Uddhav Thackeray)

 

हॉस्पिटलमध्येच किती मीटिंगा झाल्या हे

काल घर फोडण्याचाही विषय आला. राज ठाकरेंना (Raj Thackeray) शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर काढणारे एकनाथ शिंदे नव्हते. तसं जयदत्त आण्णा क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यामध्ये तेढ निर्माण करणारे एकनाथ शिंदे नव्हते. त्यामुळे क्षीरसागर यांचं कोणी घर फोडलं हे अवघ्या महाराष्ट्राला माहितेय. मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडेंसोबत (Dhanjay Munde) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करून पंकजा मुंडेवर (Pankaja Munde) अन्याय केला. हॉस्पिटलमध्ये किती मीटिंग झाल्या उद्धव ठाकरे सांगतात. पण हॉस्पिटलमध्येच किती मीटिंगा झाल्या, हे मला पण कधी तरी सांगावं लागेल, असा इशारा उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

 

तो राजकीय कलंक नव्हता का?

2019 ला आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या. त्यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) फोटो वापरला. तेव्हा आम्ही जिंकलोही. पण काही लोक काँग्रेससोबत (Congress) गेले, त्यावेळी तो राजकीय कलंक नव्हता का? असा सवालही उदय सामंत यांनी उपस्थित केला.

 

कितीही दौरे केले तरी…

टीका करत असताना तत्वाला विरोध आहे समजू शकतो. पण वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणं चांगलं नाही. त्यामुळे कितीही दौरे केले तरी महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त खासदार महायुतीचे निवडून येणार आहेत आणि 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे निवडून येणार आहेत. मला असं वाटतं की स्वत:कडे असलेले आमदार आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. जनतेच्या विकासाशी आम्ही बांधिल आहोत. जनतेचा विकास करणं हे आमचं ध्येय आणि धोरण असल्याचे उदय सामंत यांनी सांगितलं.

 

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. सोमवारी झाला नाही, मंगळवारी झाला नाही, उद्या किंवा परवा कधीतरी होईल. पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सामंत यांनी सांगितले.

 

समन्वय आणि समतोलाने खातेवाटप

एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहिलं आहे.
राज्यातील विभागनिहाय माहिती त्यांच्याकडे आहे. कोणते आमदार कुठून आले आहेत हे संख्येनुसार माहितेय.
त्यामुळे हे तिघेही अतिशय समन्वय आणि समतोलाने खातेवाटप करतील. एखादा वरिष्ठ लोकप्रतिनिधी असेल
तर त्याला चांगलं खातं मिळावं असा आग्रह असू शकतो, पण ते मिळेलच असं नाही, असेही उदय सामंत म्हणाले.

 

Web Title :  Uday Samant on Uddhav Thackeray | uday samant on uddhav thackeray
about jaydutt kshirsagar raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Traffic Updates | मेट्रो स्थानकातील पादचारी मार्गाच्या कामामुळे कसबा पेठेतील वाहतूकीत बदल

Government of Maharashtra | राज्य सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात; वेतन 20 हजार

MLA Rohit Pawar | शिवसेना-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचा नंबर, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट