Pune PMC – JICA project | ऍग्रीकल्चर कॉलेजने जागा न दिल्याने जायका प्रकल्पातील एका एसटीपीचे काम रखडले

उच्चस्तरीय पातळीवर भूसंपादनाचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC – JICA project | नदी सुधार योजनेअंतर्गत शहरातील मैला पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या ११ मैलापाणी प्रक्रिया केंद्रांपैकी (एसटीपी) १० केंद्रांचे काम सुरू आहे. परंतू ऍग्रीकल्चर कॉलेजची जागा न मिळाल्याने एका प्रकल्पाचे काम सुरू होउ शकले नाही. यासंदर्भात मुंबईत सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली असून लवकरच ही जागा संपादीत करण्याची प्रक्रिया होईल, असा विश्‍वास आहे. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अर्थसहाय्य करणार्‍या जायका कंपनीने शहरातील मोठ्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य पुरविण्याची तयारी दर्शविली, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC – JICA project)

 

महापालिकेला जायका या संस्थेने सुमारे एक हजार कोटी रुपयांचे सहाय्य केले आहे. जायका या संस्थेकडून अल्प व्याजदराने ९९० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी ८५ टक्के रक्कम केंद्र सरकारने महापालिकेस अनुदान दिले आहे. या निधीतून शहरातील आंबिल ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला व कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या सहा प्रमुख ओढ्या-नाल्यांमधून येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना), नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड या १० ठिकाणी एकूण प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ही चांगली असल्याने जायकाने आणखी काही प्रकल्पांकरीताही निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे, अशी माहीती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. (Pune PMC – JICA project)

 

दरम्यान, ११ पैकी १० ठिकाणी प्रत्यक्षात एसटीपी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दीड ते दोन वर्षात ही कामे पुर्ण होतील. परंतू या प्रकल्पातील ऍग्रीकल्चर कॉलेजच्या मालकिची जमिन अद्याप संपादीत झालेली नाही. या जागेच्या संपादनाबाबत चर्चा करण्यासाठी संबधित विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला ऍग्रीकल्चर कॉलेज सोबतच जायका व महापालिकेचे अधिकारी देखिल उपस्थित होते. लवकरच मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली नजिकच्या काळात बैठक घेउन भूसंपादनाचा विषय मार्गी लागेल, असा विश्‍वास देखिल विक्रम कुमार यांनी यावेळी व्यक्त केला.

 

समाविष्ट गावांत मैला – सांडपाणी वाहीन्या टाकणे,
प्रक्रीया केंद्र उभारण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य मिळावे यासाठी महापालिकेने जागितक बँकेकडे मदत मागितली आहे.
बँकेने देखील महापालिकेच्या आर्थिक स्थिती विषयी समाधान व्यक्त केले आहे.
यापार्श्वभुमीवर जायकाकडूनही दुसर्‍या प्रकल्पांकरीता अर्थसहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
याकरीता नवीन प्रकल्प हाती घ्यावाा लागेल, त्यादृष्टीने प्रशासन विचार करीत असल्याचेही आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

 

Web Title : Pune PMC – JICA project | The work of one of the STPs in the JICA project was stopped due to
non-grant of land by the Agriculture College

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा