Kriti Sanon | क्रिती सेनॉनने केली का प्लास्टिक सर्जरी? नेटकऱ्यांचा सवाल; भुवया व लिप्स पाहून झाले अवाक

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. क्रितीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अफडेट बद्दल जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. अभिनेत्री क्रिती ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. काही दिवसांपासून क्रिती सोशल मीडियावरुन गायब झाली होती. आता मात्र ती परतली असून तिने एक लाईव्ह सेशेन इंस्टाग्रामवर केले. मात्र यामध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनला (Kriti Sanon) पाहून नेटकरी अवाक झाले. यामध्ये क्रितीचा चेहरा सुजलेला दिसत असून तिच्या भुवया देखील वाढलेल्या दिसत (Kriti Sanon New Look) आहेत. नेटकऱ्यांनी क्रितीला तिच्या या बदलेल्या लूक्सवरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉन ही बॉलीवुडमधील य़शाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री आहे. तिच्या बारीक गोष्टींवरही चाहते नजर ठेऊन असतात. यावेळी क्रितीने एक लाईव्ह सेशन केले व ती व्हिडिओ पोस्ट देखील केली. यामध्ये ती तिच्या नवीन आऊट झालेल्या प्रोडक्ट बद्दल व वाढदिवसांबद्दल शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानले आहे. यावेळी मात्र क्रितीचा चेहरा सुजलेला दिसत असून तिच्या भुवया देखील वाढलेल्या दिसत आहे. भुवयांमुळे ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. त्याचबरोबर क्रितीचे ओठ देखील सर्जरी (Kriti Sanon Lip surgery) केल्याप्रमाणे फुगलेले दिसत आहेत. यावरुन आता क्रिती ट्रोल होत आहे.

बॉलीवुडमध्ये अभिनेत्रींना सर्जरी करण्याची आवड आहे. त्यामुळे आता क्रितीने देखील सर्जरी केली आहे का याची चिंता तिच्या चाहत्यांना लागली आहे. अनेकांनी कमेंट करुन तिला याबद्दल विचारणा केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, बोटोक्स किंवा प्लास्टिक सर्जरी (Kriti Sanon Plastic Surgery) केली आहे का ? असा प्रश्न केला तर दुसऱ्याने कमेंट केली की, तुझा चेहरा सुजल्यासारखा दिसत आहे.

नेटकऱ्यांनी अभिनेत्री क्रिती सेनॉनला (Kriti Sanon) ट्रोल जरी केले असले तरी क्रितीची तब्येत ही ठीक नाही. क्रिती ही आजारी असून या आजारपणाचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. क्रितीने ट्रोलर्सला काहीही उत्तर दिलेले नसले तरी ती आजारी असल्याचे तिने कबुल केले आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन ही लवकरच अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. तिचा आगामी गणपथ चित्रपट (Ganapath Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कामगार महिलांना लुटणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ
पोलिसांकडून अटक