KRK | मनोज वाजपेयी विरुद्ध केलेल्या ‘त्या’ ट्विटमुळे केआरके विरोधात अटक वॉरंट जारी

पोलीसनामा ऑनलाइन : आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे केआरके (KRK) उर्फ कमाल आर खान नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने एक वादग्रस्त ट्विट केल्यामुळे 30 ऑगस्ट 2022 रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. केआरके सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असतो आणि बॉलीवूडच्या कलाकारांनवर तो नेहमी निशाणा साधत असतो. तो नेहमीच आक्षेपार्य वक्तव्य करत असतो. नुकताच त्यांनी मनोज वाजपेयीवर निशाणा साधला आहे. आता मनोज वाजपेयीनी त्याच्यावर मानहानी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मनोज वाजपेयी यांनी दाखल केलेल्या तक्रारी नंतर इंदौरच्या जिल्हा न्यायालयाने केआरके (KRK) विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. याबाबत माहिती देताना मनोजचे वकील परेश जोशी म्हणाले केआरकेने ट्विट करत मनोज वाजपेयी यांना ‘चरसी’ आणि ‘गंजेडी’ म्हटले होते.

26 जुलै 2021 रोजी केआरकेने मनोज वाजपेयी विरोधात एक ट्विट केले होते. काही दिवसांपपूर्वी मनोज वाजपेयी यांची ‘फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यावेळी केआरकेने ट्विट करत “मी फालतू नसून वेबसीरिज पाहात नाही. तुम्हाला चरसी आणि गंजेडी मनोज का आवडतो?”. असा उल्लेख करत यावेळी त्यांनी मनोजला चरसी आणि गंजेडी संबोधले. त्यानंतर मनोजने केआरके विरुद्ध आपली प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांनी ट्विट केल्याचा आरोप केला आहे.

मनोजचे वकील परेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर
केआरके (KRK) विरोधात 16 मार्च रोजी अटक वॉरंट जाहीर केले तसेच त्याला 10 मे रोजी न्यायालयात
हजर राहण्यास सांगितले आहे. तर या संदर्भात स्पष्टीकरण देताना केआरके म्हणाले,
“सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या प्रकरणी जिल्हा न्यायालयात माझ्या विरुद्ध सुरू असलेल्या
या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती जेएमएफसीला करण्यात आली आहे.
तर केआरकेने कॅन्सर पीडित असल्याची माहिती जेएमएफसीला दिली आहे.”
आपला बचाव करण्यासाठी केआरकेने न्यायालयात आपण वाजपेयी किंवा कोणत्याच भारतीय सिनेसृष्टीतील कलाकारानविरोधात आक्षेपार्य वक्तव्य केले नसल्याचे भाष्य केले आहे.

Web Title :- KRK | krk vs manoj bajpayee defamation case indore court issues an arrest warrant against the self proclaimed critic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde – Gopinath Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’