Kshitee Jog | अभिनेत्री व निर्माती क्षिती जोगचे झाले फेसबुक पेज हॅक; अश्लील व्हिडिओ केल्या पोस्ट
पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती असणारी क्षिती जोग (Kshitee Jog) ही एक लोकप्रिय कलाकार बनली आहे. क्षितीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या अभिनयावर अनेक चाहते फिदा आहे. क्षिती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून अनेकदा आपल्या लाईफ अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र क्षितीचे (Kshitee Jog) सोशल मीडिया अकाऊंट आता हॅक (Kshitee Jog Account Hack) करण्यात आले असून यावरुन अश्लील व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आल्या आहेत. चाहत्यांना देखील याने धक्का बसला असून पेज रिकव्हरीचे प्रयत्न सुरु आहेत.
अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री क्षिती जोग हिने तिच्या अभिनयाची प्रेक्षकांच्या मनात छाप उमटवली आहे. तिची ‘झिम्मा’ चित्रपटातील (jhimma Movie) भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ती ‘झिम्मा’ चित्रपटाची सह निर्माती देखील होती. प्रसिद्ध निर्माती व अभिनेत्री असलेल्या क्षितीच्या फेसबुक पेजवरुन अश्लील पोस्ट शेअर होऊ लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. चाहत्यांनी देखील कमेंट करत त्यांना य़ाबद्दल माहिती दिली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर क्षिती जोगचा नवरा दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत नेटकऱ्यांना सांगितले आहे.
हेमंत ढोमे याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले आहे की, “चलचित्र मंडळीच्या निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. पेजवरुन काही अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावे आम्ही पेज पुन्हा सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा हीच विनंती.”
अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) ही मराठी प्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे.
नुकतीच ती करण जोहरच्या (Karan Johar) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)
या चित्रपटामध्ये झळकली. चित्रपटाप्रमाणे क्षितीच्या अभिनयाचे कौतुक सर्वांनी केले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Deepika Padukone | दीपिका पादुकोण झाली पापाराझींवर नाराज, म्हणाली “हे अलाऊड नाही…!