Deepika Padukone | दीपिका पादुकोण झाली पापाराझींवर नाराज, म्हणाली “हे अलाऊड नाही…!

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलीवुड आणि हॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दीपिका ही सतत चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. पापाराझी देखील तिची एक झलक कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी तिच्या मागे असतात. मात्र आता दीपिकाचा (Deepika Padukone Annoyed To paparazzi) एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती पापाराझींवर नाराज (Deepika Padukone) झालेली पाहायला मिळत आहे. बॅकस्टेजला पापाराझी दीपिकाचे फोटो घेऊ लागताच ती म्हणते की हे अलाऊड नाहीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमी पापाराझींना हसून पोज देताना दिसून येते. यावेळी मात्र तिने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हायरल व्हिडिओ मागील महिन्यात झालेल्या फॅश डिझायनर मनीष मल्होत्राचा ब्रायडल फॅशन शो (Manish Malhotra Bridal Fashion Show) मधील आहे. यावेळी तिने सासू सोबत हजेरी लावली होती. या शे मधील रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt)  रॅम्प वॉक गाजला होता. मात्र बॅकस्टेजला दीपिका तिच्या सासूसोबत (Deepika Padukone In Manish Malhotra Show) उभी राहिली होती. यावेळी पापाराझी तिचे फोटो घेण्याचा प्रयत्न करु लागले. पण तिने त्यांना तत्काळ थांबवायला सांगितले. हे बॅकस्टेज आहे. इथे फोटो अलाऊड नाहीये असे अभिनेत्री दीपिका पादुकोणने पापाराझींना सांगितले. तिची नाराजी ही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

दीपिका पादुकोण हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिचे समर्थन केले आहे.
एका नेटकऱ्य़ाने कमेंट केले आहे की, “अर्थात…तिथे मॉडेल्स असतात, ज्या कपडे बदलत असतात, 
विश्रांती घेत असतात आणि तिथे कॅमेऱ्याला अलाऊट नसतो”.
तर दुसर्‍याने लिहिले आहे की, “चांगले केले…तिने जे सांगितले त्याचा आदर केला गेला.”
दीपिका पादुकोण ही तिच्या आगामी बिग बजेट चित्रपटांमुळे (Deepika Padukone) देखील चर्चेत आहे.
दीपिकाचा अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) सोबत ‘फायटर’ (Fighter) तर अभिनेता प्रभास (Prabhas) सोबत ‘कल्की 2898 AD’ (Kalki 2898 AD) या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
तसेच ती शाहरुखच्या (SRK) ‘जवान’ (Jawan) चित्रपटामध्ये देखील कॅमियो भूमिका साकारणार आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 
‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत (Ajay Devgn) 
स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ananya Pandey | अनन्या पांडेला वाटते ड्रीम गर्ल 2 मधील पुजाबदद्ल इनसिक्योरिटी; पुजा आणि माझी होणार तुलना…!