‘कुमकुम भाग्य’ फेम ‘लीना’ नं शेअर केले ‘टॉपलेस’ फोटो म्हणाली – ‘बोरींग कपडे घालण्यासाठी लाईफ खूप शॉर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुमकुम भाग्य फेम लीना जुमानीची सध्या सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे लीनानं शेअर केलेले फोटो आहेत. लीनानं सोशलवरून काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. लीनाचे हे फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे लीना या फोटोंमध्ये टॉपलेस दिसत आहे. लीना सध्या सोशलवर चर्चेत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोत लीना अनेक मादक अंदाजात पोज देताना दिसत आहे. टॉपलेस झालेल्या लीनानं फक्त एका हॅटच्या मदतीनं आपली अप्पर बॉडी कव्हर केली आहे. लीना या फोटोंध्ये कमालीची हॉट दिसत आहे.

फोटो शेअर करताना लीना म्हणते, “बोरींग कपडे घालण्यासाठी लाईफ खूप शॉर्ट आहे.” लीनानं दिलेलं कॅप्शनही विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे. लीनाचे हे बोल्ड फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. लीना सोशलवर नेहमीच सक्रिय असते.

लीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिला कुमकुम भाग्य या मालिकेतून जास्त ओळख मिळाली. या मालिकेत तिनं तनुची भूमिका साकारली आहे.