अभिनेता कुणाल खेमूला इनायाने दिले ‘असे’ गिफ्ट ; व्हिडीओ व्हायरल…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्टर आणि सोहा अली खान यांचे पती कुणाल खेमू आज 35 वा जन्मदिवस साजरा करत आहेत. कुणाल ने परिवार आणि जवळच्या मित्रांसोबत बर्थडे पार्टी साजरी केली. बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो कुणालने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटोमध्ये कुणाल, सोहा, करीना आणि सैफ अली खान यांची बॉण्डिंग दिसून येत आहे. बर्थडेच्या खास दिवशी कुणालला स्पेशल गिफ्ट त्याची मुलगी एंजेल इनाया कडून भेटले. कुणाल ने इन्स्टाग्रामवर आपल्या लहान मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये क्युट अंदाज मध्ये पियानो वाजवत ‘हैप्पी बर्थडे पापा’ गाणं गात आहे. कुणालने तिच्या या क्युट व्हिडीओला कैप्शन दिले की, ‘The Best Best Bestest Birthday Gift Ever!!!’

२९ सप्टेंबर रोजी सोहा-कुणालच्या घरी इनायाचा जन्म झाला. त्या दिवशी महानवमी होती त्यामुळे इनायाचे पूर्ण नाव इनाया नाओमी खेमू ठेवले. सेलेब्रिटी किड्स बद्दल सांगायचे झाले तर सध्या सर्वत्र तैमूरच चर्चेत असल्याचे दिसत आहे. परंतु इनाया नाओमी देखील आपल्या क्युटनेसच्या ओवरडोजने तैमूरला तगडं कॉम्पिटीशन देत आहे. बर्थडे बॉय बद्दल बोलायचे गेले तर त्याने एका बालकलाकाराचे काम देखील केले आहे. यामध्ये राजा हिन्दुस्तानी, जख्म, हम हैं राही प्यार के सारखे चित्रपट सामील आहेत.