औरंगाबाद दंगलीप्रकरणी लच्छू पैलवानला अटक

औरंगाबाद :पोलिसनामा ऑनलाईन 

काही दिवसांपूर्वी भडकलेल्या औरंगाबाद दंगलीप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक करण्यात आली आहे. दंगल भडकवणे, जाळपोळ करणे या आरोपांखाली लच्छू पैलवानला सिटी चौक पोलिसांनी काल रात्री अटक केली.याआधी आरोपी म्हणून याआधी एमआयएमचे नेते आणि नगरसेवक जंजाळ यांना अटक करण्यात आली होती.

औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात 11 मे रोजी किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. तर यात दोघांचा मृत्यू झाला होता. दंगल नेमकी कशावरून घडली याबाबत अनेक चर्चा होत आहेत . महापालिकेच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन मोतीकारंजा भागात दोन गटात हाणामारी झाली. त्याच हाणामारीने उग्र रुप धारण केले आणि मग भडका उडाला, असाही काहींचा दावा आहे.या दंगलीनंतर राजकीय दंगल देखील वाढीस लागली होती.