कोंड्यापासून तर त्वचा तरुण दिसण्यापर्यंत, जाणून घ्या भेंडीच्या सेवनाचे अन् फेसपॅकचे ‘हे’ 8 आश्चर्यकारक फायदे !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भेंडी शरीरासाठी खूप पौष्टीक असते. भेंडी चरबीमुक्त असते. यात ही कमी असतात. यात व्हिटॅमिन ए, सी, ई यांसह, गॉम्बो, पायराईडॉक्साईन, सोडियम, सेलेनियम आणि थायमिन पायराइडॉक्साईन हे पोटॅशियम स्टोअर आहेत. आज आपण भेंडीचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) तजेलदार त्वचा – भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. याचा त्वचेला फायदा मिळतो. भेंडीचं सेवन केलं तर त्वचा तजेलदार आणि निरोगी रहाते. त्वचा निरोगी करायची असेल तर ओर्गेनिक ओरका पावडर आणि पाण्याची गरज आहे. दोन्ही एका भांड्यात एकत्र करून घ्या. तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांपर्यंत लावा. त्यानंतर गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा या फेसपॅकचा वापर करा.

2) तरुण त्वचा – त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी भेंडीच्या भाजीचं सेवन करा. भेंडीत व्हिटॅमिन सी असल्यानं त्वचा निरोगी आणि तरुण राहते. तुम्ही भेंडीचा फेसपॅकही करू शकता. यामुळं त्वचा आणखी तजेलदार होते. यासाठी भेंडी कापून 10 मिनिटे पाण्यात उकळून घ्या. यानंतर त्यात दही आणि ऑलिव्ह ऑईल टाका. यांचं व्यवस्थित मिश्रण करून घ्या. हा फेसपॅक आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवूनही वापरू शकता. आठवड्यातून दोन वेळा या फेसपॅकचा वापर करावा. 15 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ करावा.

3) चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि पुरळं – या समस्या दूर करायच्या असतील तर भेंडीचा वापर करा. यात असणारं लिसलिसा जेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, एनालजेसिक, अँठी इंफ्लेमेटरी आणि रि हायड्रेटींग प्रॉपर्टीज असलेलं असतं. भेंडीच्या सेवनामुळं चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळं कमी होतात.

4) केसांची निगा – केसांची निगा राखायची असेल तर आहारात भेंडीचा समावेश करावा. यानं तुम्हाला फायदा मिळेल.

5) डोळ्यांची रोशनी – भेंडीत व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सिडंट्स भरपूर असतात जे सेल्युलर चयापचयानं उत्पन्न झालेल्या मुक्त कणांना समाप्त करण्यात सहाय्यक असतात. हे कण नेत्रहीनतेसाठी जबाबदार असतात. भेंडीमुळं मोतीबिंदूपासूनही बचाव होतो.

6) पचन वाढवते आणि सलभ करते – आपल्या आहारात फायबरचं प्रमाण जास्त असायला हवं. फायबरमुळं पचनतंत्र चागलं राहतं. यामुळं मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता, जास्त गॅस या समस्या टाळता येतात. भेंडीचं सेवन केलं तर पचनक्रिया सुलभ होते.

7) कोंड्याचा त्रास – भेंडीचं सेवन केलं तर तुमचा कोंड्याचा त्रास दूर होण्यास मदत होते. यामुळं केसांचा इचीनेस आणि ड्रायनेसही दूर होतो.

8) हृदय – भेंडीचं सेवन आपल्या हृदयाला देखील तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतं. पॅक्टीन कोलेस्टेरॉलला कमी करण्याचं काम भेंडी करते. यात असणारे विरघळणारे फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलला नियंत्रित करतात. यामुळं हृदयरोगांचा धोका कमी होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.