Lahore 1947-Sunny Deol | ‘गदर २’ च्या यशानंतर सनी देओलच्या ‘लाहोर- १९४७’ चित्रपटाची घोषणा; आमिर खान करणार निर्मिती

मुंबई : Lahore 1947-Sunny Deol | सध्या बॉलिवूडमधून एक मोठी बातमी आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स या आमिर खानच्या (Aamir Khan) कंपनीने लाहोर-१९४७ या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटात सनी देओल प्रमुख भूमिकेत असणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. (Lahore 1947-Sunny Deol)

आमिर खान प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकेपीची संपूर्ण टीम सनी देओल अभिनीत आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित लाहोर-१९४७ या चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंदी आहे. आम्ही अत्यंत टॅलेंटेड सनीसोबत आणि आवडते दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आम्‍ही जो प्रवास सुरू केला आहे तो समृद्ध होण्‍याची अशा बाळगतो. तुमचे आशीर्वाद हवे आहेत. (Lahore 1947-Sunny Deol)

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या या पोस्टवर एका यूझर्सने कमेंट केली आहे की, व्वा! माझे दोन आवडते अभिनेते एकत्र येत आहेत. तर दुसऱ्या युझरने म्हटलेय, गदर २ प्रमाणेच हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर होईल.

राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी घायल, दामिनी आणि घातक यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे.
आता हे दोघे लाहोर-१९४७ चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत.

सध्या सनी देओल गदर-२ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.
आता लाहोर-१९४७ चित्रपटाच्या घोषणेनंतर सनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना