Lalit Patil Drug Case | ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह तिघांची ऑर्थर रोड कारागृहात होणार रवानगी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Lalit Patil Drug Case | पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालवणारा आणि रुग्णालयातून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्ज माफिया (Drug Mafia) ललित पाटील याच्यासह तिघांचा दहा दिवसांचा नाशिक पोलीस कोठडीतील मुक्काम संपला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याच्यासह तिघांची रवानगी आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) केली जाणार आहे.

एमडी ड्रग्ज (MD Drugs) व ससून हॉस्पिटल प्रकरणात (Sassoon Hospital Case) मागील काही महिन्यांपासून चर्चेत आलेला ललित पाटीलसह (Lalit Patil Drug Case) त्याचे साथीदार रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) गेल्या शुक्रवारी घेतला होता. त्यांना पोलीस बंदोबस्तात शनिवारी (दि.16) जिल्हा व सत्र न्यालयापुढे हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने ललित पाटील रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत यांना थेट दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
सोमवारी (दि.18) पोलीस कोठडी (Police Custody) संपल्याने त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर
करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश यु.जी. मोरे (District Sessions Judge U.G. More) यांच्या न्यायालयाने
दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत चौघांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मंजूर केली.
सरकार पक्षाकडून न्यायालयाला न्यायालयीन कोठडीचा रिपोर्ट सादर करण्यात आला.
त्यामुळे या चौघांना मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात दिले जाणार असून त्यांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारी टोळी गजाआड, दागिने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या

Pimpri-Chinchwad PCMC News | पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नियोजित पुनावळे घनकचरा प्रकल्प रद्द, मंत्री उदय सामंत यांची माहिती