Pune Pimpri Chinchwad Crime News | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारी टोळी गजाआड, दागिने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून 14 गुन्हे उघडकीस, 16 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या (Gold Chain Theft) टोळीला आणि चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या दोन सराफ व्यावसायिकांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या (Pimpri Chinchwad Crime Branch Unit-4) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 14 गुन्हे उघडकीस आले असून 16 लाख 30 हजार रुपये किमतीचे 255 ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त करण्यात आले आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार (वय-19 रा. खडकी स्मशानभुमी जवळ, खडकी), अक्षय अशोक मुरकुटे (वय-31 रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), धिरज गोपाळ गवळी (व-31 गवळीवाडा, खडकी), चोरीचे दागिने घेणारे अभिषेक ज्वेलर्सचे (Abhishek Jewellers) गणपत जवारहलाल शर्मा (वय-44 रा. मांगल्य सोसायटी, खडकी) आणि रमेश ज्वेलर्सचे (Ramesh Jewellers) दर्शन रमेश पारिख (वय-32 रा. निता कॉर्नर, खडकी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर महादेव उर्फ महाद्या उर्फ अजय गौतम थोरात (रा. खडकी) हा फरार आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी (Sangvi Police Station) आणि भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) सोनसाखळी हिसकावणाऱ्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना आनंद लोहार याला खडकी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता महादेव उर्फ अजय थोरात याच्या मदतीने महाळुंगे पोलीस ठाण्याच्या (Mahalunge Police Station) हद्दीतून दुचाकी चोरून सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी लोहार याच्याकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, चोरलेला मुद्देमाल अशय मुरकुटे व धिरज गवळी याच्या मार्फत गणपत शर्मा व दर्शन पारिख यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरीचे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या दोन ज्वेलर्स यांना अटक केली. आरोपींकडून 13 सोनसाखळी व एक वाहन चोरी असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सांगवी पोलीस ठाण्यातील 4, भोसरी पोलीस ठाण्यातील-2,
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (Bhosari MIDC Police Station)- 2, महाळुंगे पोलीस ठाण्यातील-2,
हिंजवडी (Hinjewadi Police Station), चिखली (Chikhli Police Station), विश्रांतवाडी
(Vishrantwadi Police Station) आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील (Koregaon Park Police Station) प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने
(ACP Satish Mane), सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner) यांच्या
मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil),
सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, आबासाहेब किरनाळे,
पोलीस अंमलदार नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, आदिनाथ मिसाळ, प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ,
सुरेश जायभाये, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत गिरीश महाजनांचे संबंध, खडसेंचा गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Amol Mitkari | खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा भुजबळांचा आरोप, मिटकरी म्हणाले – ‘नागपूरमधील राजे भोसले हे…’

Pune PMC Water Supply News | गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

गाडीचा कट लागल्याने दोन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पिंपळे गुरव येथील घटना; एकाला अटक

झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश