कुलू मनालीत दरड कोसळण्याची दुर्घटना

कुलू-मनाली (हिमाचल प्रदेश ) : वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेशातील कुलू-मनालीच्या जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रात्री ९ च्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे मंडी-मनाली हा महामार्ग ठप्प झाला आहे. या दुर्घटनेत हजारो नागरिकांसह अनेक पर्यटक अडकले आहेत.

 [amazon_link asins=’B0748NPV86,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]
मुसळधार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे शिमला जिल्ह्यातील काही  गावांचा संपर्क तुटला असून अनेक पर्यटक शिमलामध्ये अडकले आहेत. या अडकलेल्या पर्यटकांमध्ये  महाराष्ट्रातील १२ पर्यटकांचा समावेश आहे.  राज्यातील चार जण हे पुण्यातील रहिवासी आहेत . NH -२१  या  राष्ट्रीय महामार्गावर रात्री नऊच्या  सुमारास  दरड कोसळण्यास सुरुवात झाली . त्यामुळे  हा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला.
 सकाळ पासून दरड हटवण्याचं  काम सुरु करण्यात आलं आहे.