Late MLA Mukta Tilak | आमदार स्व.मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार व तपासणी शिबिराचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Late MLA Mukta Tilak | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने 17 आणि 18 ऑगस्ट रोजी मोफत कर्करोग तपासणी, मार्गदर्शन आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फौंडेशनचे शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि कुणाल टिळक (Adv Kunal Tilak) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Late MLA Mukta Tilak)

आमदार मुक्ता टिळक पाच वर्षे कर्करोगाशी धैयाने लढा दिला. मात्र, मागीलवर्षी डिसेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. टिळक यांच्या स्मरणार्थ मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. कर्करोग पिडीत रुग्णांची सेवा हा या फाउंडेशनचा प्रमुख उद्देश आहे. त्याला अनुसरूनच फाउंडेशनच्यावतीने 17 ऑगस्टला मुक्ता टिळक यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त कर्करोग पिडीत रुग्णांसाठी मोफत तपासणी, मार्गदर्शन आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी नारायण पेठेतील टिळक वाड्यातील लोकमान्य सभागृहामध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेत हे शिबीर होणार असून तज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. कर्करोगावर उपचार सुरू असणारे तसेच या शिबिरात निदान होणार्‍या पहिल्या १०० रुग्णांवर केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडियशनचा खर्च फाउंडेशनच्यावतीने करण्यात येणार आहे. (Late MLA Mukta Tilak)

मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी साठी खालील ठिकाणी संपर्क करावा.
अ‍ॅड. कुणाल टिळक जनसंपर्क कार्यालय, 568, नारायण पेठ,टिळक वाडा,पुणे ३०.
फो. 020-29809656 / 9422332988 / 9689935620 असे आवाहन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘…तर मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडू’, आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा (व्हिडीओ)

Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय