LIC ची खास पॉलिसी ! दिवसाला फक्‍त ९ रूपये खर्च करून मिळवा ४.५६ लाख रूपये आणि टॅक्स वाचवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय उत्तम योजना आणली आहे. या योजनेचे नाव ‘न्यू जीवन आनंद पॉलिसी’ असून यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीचा दुप्पट फायदा होणार आहे. यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला आयकरातून सूट मिळणार आहे. त्याचबरोबर हा विमा तुम्हाला आयुष्यभरासाठी मिळणार आहे. जर विमाधारकाचा मृत्यू हा पॉलिसी संपल्यानंतर झाला तरी त्याला या विम्याचे पैसे मिळणार आहेत.

Latest LIC New Jeevan Anand Policy safe your health and tax know all its benefits

अशाप्रकारे मिळवा फायदा

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षी पॉलिसी घेतली आणि १ लाख सम एश्योर्ड साठी त्याने ३५ वर्षांची मुदत घेतली तर त्याचा वर्षाचा हफ्ता हा १ लाख ७ हजार ६४५ रुपये असणार आहे. त्याला हि रक्कम ३५ हफ्त्यांमध्ये भरावी लागणार आहे. हि विमा पॉलिसी मॅच्युयर्ड झाल्यानंतर पॉलिसी धारकाला ४ लाख ५६ हजार रुपये मिळणार आहेत.

१) हा व्यक्ती घेऊ शकतो पॉलिसी
न्यू जीवन आनंद पॉलिसी १८ ते ५० वयातील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. यासाठी तुमचे कमीत कमी वय हे १८ वर्ष असावे.

२) मिनिमम सम एश्योर्ड
या पॉलिसीमध्ये कमीतकमी १ लाख रुपये गुंतवण्याची गरज पडणार आहे. त्याचबरोबर यामध्ये रक्कमेची कोणतीही लिमिट ठेवण्यात आली आहे. तुम्हाला हवे तितक्या रकमेचे तुम्ही पॉलिसी घेऊ शकता.

३) पॉलिसीचा अवधी
या पॉलिसीचा अवधी हा १८ ते ३५ वर्षांपर्यंत आहे. या पॉलिसीला तुम्ही ऑफलाइन बरोबरच ऑनलाइन देखल खरेदी करू शकता.

४) पॉलिसीचा हफ्ता
या पॉलिसीमध्ये तुम्ही तीन महिने, सहा महिने आणि प्रत्येक महिन्याला देखील हफ्ता भरू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे हि पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही यावर ३ वर्षानंतर कर्ज देखील काढू शकता.

५) मॅच्युरिटी वर मिळणार इतका फायदा
सम एश्योर्ड बरोबरच सिंपल रिवर्सनरी बोनस आणि फायनल एडिशनल बोनस देखील तुम्हाला या पॉलिसीमध्ये मिळणार आहे.

६) पॉलिसी सुरु असताना मृत्यू झाल्यास
जर पॉलिसी धारकाचा मध्येच मृत्यू झाला तर ज्या वारासदाराचे नाव दिले असेल त्याला हि रक्कम दिली जाईल. विम्याच्या रकमेच्या १२५ टक्के रक्कम त्याला दिली जाईल.

७) आयकरात सूट
याचबरोबर आयकर नियम ८० क द्वारे तुम्हाला आयकरातून देखील सूट मिळणार आहे.