मनुष्याची लाळसुद्धा होऊ शकते सापासारखी विषारी, जपानी शास्त्रज्ञांच्या रिसर्चमधून झाला खुलासा

नवी दिल्ली : तुमचा विश्वास बसणार नाही पण मनुष्यसुद्धा सापाप्रमाणे विष निर्माण करू शकतो. एका ताज्या रिसर्चमधून समजले आहे की, मनुष्याची इच्छा असेल तर तो आपली लाळ एखाद्या सापाप्रमाणे विषारी बनवू शकतो. जपानच्या ओकिनावा इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मनुष्यात असे जीन शोधून काढले आहेत, जे पिट वायपर सापांच्या विषाप्रमाणे काम करतात. त्यांना आढळले की, तोंडात विष तयार करण्यासाठी जो आवश्यक आधार हवा असतो तो रेपटाइल्ससोबत सस्तन जीव म्हणजे मॅमल्समध्ये सुद्धा अगोदरच असतो, ज्याद्वारे हे म्हटले जाऊ शकते की, मनुष्य सुद्धा विष तयार करण्याची क्षमता निर्माण करू शकतो. यानुसार मनुष्यच नव्हे अनेक मॅमल्स विष तयार करू शकतात.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मनुष्यसुद्धा जगातील सर्वात विषारी साप रॅटल स्नेक आणि सर्वात विषारी सस्तन डकबिल म्हणजे प्लॅटीपसप्रमाणे विष बनवू शकतो. स्टडीतून हा पहिला ठोस पुरावा मिळाला आहे जो सांगतो की, सापांच्या विषारी ग्रंथी आणि मनुष्याच्या ग्रंथीमध्ये एक लिंक म्हणजेच समानता आढळली आहे. सायंटिस्ट्सचे म्हणणे आहे की, हे मनुष्यांच्या फ्लेक्सिबल जीन्समुळे झाले आहे. हे जीन्स सलायवरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथींना विषारी बनतात.

ओकिनावा इन्स्टीट्यूटमध्ये या स्टडीच्या रिसर्चर अग्नीश बरूआ यांनी म्हटले की, अ‍ॅनिमल किंगडममध्ये जीन्सच्या प्रभावामुळे लाळ ग्रंथी आवश्यकतेनुसार विकसित होतात किंवा बदलतात. मनुष्य सुद्धा त्या स्तराचे विष तयार करू शकतो, फक्त जीन्समुळे त्याच्या लाळ ग्रंथी त्याप्रमाणे विकसित झाली पाहिजे. तोंडातील विष रॅपटाइल्समध्ये अतिशय सामान्य बाब आहे. हे विविध जीव जसे की कोळी, साप, गोगलगाय इत्यादीमध्ये आवश्यकतेनुसार डेव्हलप होते.

अग्नीश यांच्यानुसार, माकड एकमेव जीव आहे ज्याच्या तोंडात विषारी ग्रंथी आहेत. जैवशास्त्रज्ञ सांगतात की, विष लाळ ग्रंथींच्या विकासातून तयार होते. परंतु आता शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे की, याच्या पाठीमागे मॉलीक्यूलर मॅकेनिक्स काम करते. अग्नीश बरूआ यांचे म्हणणे आहे की, विषारी पदार्थ कुणाच्याही शरीरात विकसित होऊ शकतात.