‘सैराट 2’ मध्ये काम करण्याची ‘या’ मराठी अभिनेत्रीची इच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमा सगळ्यांनीच पहिला असेल. यामधील अभिनेत्री अदिती पोहनकर हीने आपल्या पहिल्याच चित्रपटातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. यावेळी तिने गाजलेल्या सैराट २ या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली कि मराठी सिनेमा नेहमीच माझं पहिलं प्रेम राहिले आहे. मात्र, भूमिकाही तशा मिळायल्या हव्यात. ‘सैराट २’ सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचं देखील तिने यावेळी म्हटले.

https://www.instagram.com/p/B8EFOBKDB9g/?utm_source=ig_web_copy_link

अदितीने सुरुवातीपासूनच निवडक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी आणि तामिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. त्यामुळं तिने मोजक्याच भूमिका केल्या आहेत . मात्र या सगळ्या भूमिका प्रसिद्ध झाल्या आहेत. आतापर्यंत अदितीने निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा प्रसिद्ध दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. लय भारी सिनेमानंतर तिने ट्रकभर स्वप्न या सिनेमात देखील काम केलं आहे. त्यामुळं विविध प्रकारच्या भूमिका करण्याचं तिचं स्वप्न आहे.

https://www.instagram.com/p/B8A5WbfjfSK/?utm_source=ig_web_copy_link

सध्या आदिती हिंदी वेबसीरीजमध्ये काम करत आहे.यामध्ये ती बॉबी देओल बरोबर आश्रम या सिरीजमध्ये काम करत आहे. त्याचबरोबर ‘शी’ या वेबसिरीजमध्येही तिच्या भूमिकेचं मोठं कौतुक झालं होतं.त्यामुळं आता तिने सैराट २ मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अदिती इंडस्ट्रीमध्ये स्थान भक्कम करत असून स्पोर्ट्स आणि संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ती आली आहे. तिचे आणि वडील दोघेही खेळाडू होते. आई शोभा पोहनकर या प्रसिद्ध हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पिअन आहेत. तर काका पंडीत अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत. त्यामुळं तिने पूर्ण वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये नाव कमावून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

https://www.instagram.com/p/B7_UOfYjFZS/?utm_source=ig_web_copy_link