अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला नांदगाव शिवारात मोठी गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी जात आहे. महानगरपालिकेची मुळा धरणातून शहरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नांदगाव शिवारात फुटली आहे. या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेला लेखी तक्रार करूनही महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. पावसास विलंब होत असल्याने पाणी प्रश्न बिकट होत चालला आहे. अशी परिस्थिती असतानाही दुसरीकडे हजारो लिटर पाणी गळती होत असतानाही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. महानगरपालिका प्रशासन नागरिकांना पाणी जपून वापरा म्हणून आवाहन करीत असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्याच दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे.

महापालिकेची नांदगाव परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीकडे आता तरी महापालिका प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like