‘या’ 3 गुणकारी पानांचे सेवन केल्याने होतो अधिक फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक आजारासाठी उपयुक्त असणाऱ्या काही वनस्पती असतात. प्रथोमपचार म्हणतो ना तेच ते अर्थात डायबेटीज, हायपर टेन्शन आणि अन्य आजारांवर देखील गुणकारी औषध म्हणून या आयुर्वेदाचा वापर केला जातो. तर उपयुक्त असणाऱ्या अशा तीन पानांबद्दल जाणून घ्या. की, कशा पद्धतीने याचा उपयोग आपणाला होतो. तर हे तीन पान तुम्ही अनुषा पोटी खाल्ल्यावर तुमच्या समस्यांवर अधिक जलदतेने कार्य करत असतं. हे तीन पाने आपल्या घराभोवती, परिसरात उपलब्ध असतात. त्यामुळे लांबून कुठून आणण्याची आवश्यकता नाही. तर या तीन पानाचे माणसाला काय फायदे आहेत. हे जाणून घ्या.

1. कडूलिंबाचे पान –
कित्येक आजारांवर कडुलिंबाची पाने खाणे आधी उपयुक्त आहे. तसेच, कडूलिंबाच्या पानांचा उपयोग त्वचेवर उठलेल्या अ‍ॅलर्जीसाठी केला जातो. अशावेळी कडुलिंबाच्या पाने पाण्यात उकळून त्याची आंघोळ केली जाते. डायबेटीज असल्यास कडूलिंबाची पानं खावीत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी नियंत्रणात येते. कडूलिंबात अॅंटीहिस्टामाइन असते त्यामुळं रक्तवाहिन्या पातळ होतात. उच्च रक्तदाब समस्या असणाऱ्या व्यक्तीसाठी कडूलिंब पान फार उपयुक्त आहे. एक महत्वाचे म्हणजे, कडूलिंबाच्या पानांचे अधिक सेवन केल्यास माणसाच्या साखरेची लेव्हल कमी होऊ शकते. आणि हे माणसाच्या शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणून कडुलिंबाची पाने खाल्ल्यावर वारंवार साखर तपासणे हा देखील एक उपाय आहे.

2. तुळशीचे पान –
तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. सर्वात महत्वाचे रूप यामध्ये असते. अनेक घरामध्ये तुळस असते. तसेच ग्रामीण भागात तुळशीची पूजा आता सुद्धा केली जाते. दररोज उपाशी पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्यास डायबेटीज, हायपरटेंशन आणि हार्ट प्रॉब्लेम व्यवस्थित आणि नियंत्रणात राहतात. ,मात्र, महत्वाचे म्हणजे, फक्त लक्षात घ्या की, तुळशीच्या पानांमध्ये पारा आणि लोह असते. त्याचे अतिसेवनही शरिरासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच माणसाच्या दातांवर याचा परिणाम दिसू शकतो. यामुळे तुम्ही तुळशीची पाने पाण्याबरोबर मिश्रण करून पिऊ शकता.

3. कढीपत्त्याचे पान –
आहारामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण कढीपत्त्याच्या पानांचा वापर करतो. म्हणून, जेवणाला अधिक चव येते. परंतु, आपल्या शरीरात अनेक गुणधर्मांचा प्रवेश होतो. डायबेटीजच्या रुग्णांसाठी कढीपत्ता हे अधिक महत्वाचे पर्याय आहे. कढीपत्त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील कमी होते.