कोल्हापूर : जिल्ह्यात ‘या’ तारखेला सरपंचपदाचे आरक्षण सोडत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    कोरोना संसर्गामुळे राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. यापार्श्‍वभूमीवर रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या सर्वत्रच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बोलबाला आहे. जिल्ह्यातील १०२५ पैकी ६०२ ग्रामपंचायतीत सरपंचपद खुल्या प्रभागासाठी (सर्वसाधारण) आरक्षित असेल. दरम्यान, जिल्ह्यातील यापैकी अनुसूचित जाती, जमाती, मागास व सर्वसाधारण प्रवर्गातील ५० टक्के महिला व सर्व साधारण आरक्षणाची सोडत मंगळवारी ( ता. १५) सकाळी १० ला ज्या-त्या तालुक्‍याच्या ठिकाणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल आरक्षणाचा आदेश लागू केला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींची सोडत जाहीर केली आहे. २०२०-२५ साठी हे आरक्षण असणार आहे. यामध्ये, तहसीलदारांनी यापूर्वीच्या निवडणूकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा विचार करुन सरपंच पदे प्रवर्गनिहाय आलटून-पालटून नेमून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या पातळीवर सर्वांना सूचना द्याव्यात. तसेच गावात दवंडी देवून सोडतीबाबत माहिती द्यावी. ग्रामपंचायतीच्या फलकावर ३ दिवस ही सूचना लिहून द्यावी. अशाही सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण

तालुका* एकूण ग्रामपंचायती* अनुसूचित जाती* अनुसूचित जमाती* मागास प्रवर्ग* सर्वधारण
स.सा.- स्त्री* स. सा.- स्त्री* स. सा.- स्त्री* स. सा.- स्त्री*
शाहुवाडी* १०६* ६-७* १-०* १५- १४* ३१-३२
पन्हाळा* १११* ८-८* ०-०* १५-१५* ३२-३३
हातकणंगले*६०*६-६* ०-१* ८ -८* १६-१५
शिरोळ* ५२* ५-५* १-१* ७-७* १३-१३
करवीर* ११८* ९-१०* १-०* १६-१६* ३३-३३
गगनबावडा* २९* ३-२* ०-०* ४-४* ८-८
राधानगरी* ९८* ६-५* ०-०* १३-१४* ३०-३०
कागल* ८३* ६-६* ०-०* ११-११* २५-२४
भुदरगड* ९७*५-६* ०-०* १३-१३*३०-३०
आजरा* ७३* ४-४* ०-०* १०-१०* २२-२३
गडिंहग्लज* ८९* ५-५* ०-१* १२- १२* २७-२७
चंदगड* १०९* ६-५* १-१* १४- १५* ३४-३३
एकूण* १०२५* ६९-६९* ४-४* १३८-१३९* ३०१-३०१

असे आहे आरक्षण

सरपंचपदासाठी आरक्षित प्रवर्ग* एकूण सरपंचपदाची संख्या
अनुसूचित जाती (महिलांसह)* १३८ पैकी ६९ महिलांसाठी आरक्षित

अनुसूचित जमाती (महिलांसह)* ८ पैकी ४ महिलांसाठी आरक्षित
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह)* २७७ पैकी १३९ महिलांसाठी आरक्षित

सर्वसाधारण (महिलांसह)* ६०२ पैकी ३०१ महिलांसाठी आरक्षित

पन्हाळा तालुक्यातील १११ ग्रामपंचयतींचे सरपंच पदाची आरक्षण सोडत

पन्हाळा तालुक्यातील १११ ग्रामपंचयतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मयूर उद्यानातील नगरपरिषद हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील १११ ग्रामपंचयतींच्या सरपंच पदापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १६ जागा असून त्यामध्ये ८ स्त्रियांच्या साठी राखीव असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३० जागा असून त्यामध्ये १५ स्त्रियांच्या साठी राखीव असणार आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६५ जागा असून त्यामध्ये ३३ स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे १११ जागांपैकी ५६ जागा या महिलांसाठी साठी राखीव असणार आहेत. सरपंच आरक्षण कार्यक्रम जाहीर झाल्याने तालुक्यातील ग्राम पंचयती राजकीय क्षेत्रातउत्साहाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, निवडणूक होणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील ४२ ग्राम पंचायतींची प्रभाग निश्चिती झाली आहे तर प्रभाग निहाय मतदार निश्चितीची कच्ची यादी प्रसिध्द करून त्यावर हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे प्रभाग निहाय मतदारांची नावे निश्चित करण्यासाठी इच्छुकांनी हरकती घेतल्या आहेत. ४२ ग्राम पंचायतींपैकी २६ पंचायती मध्ये ८४ हरकती दाखल झाल्या आहेत. तर १६ ग्रामपंचायतींसाठी एक ही हरकत आलेली नाही. दाखल हरकती मध्ये सर्वाधिक पोर्ले/ठाणे येथे २७ तर कोडोली मध्ये ९ हरकती घेण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतींची शाहूवाडी विभागीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन अंतिम या याद्या १० रोजी प्रसिद्ध होणार आहेत.

ग्रामपंचायत निहाय दाखल हरकती

जाफळे(५) पोखले(२) सातार्डे(२) पुशिरे/बोरगाव(२) नेबापूर(२) आरळे(२), इंजोळे(३), बुधवार
पेठ(४) आपटी(२) वाघवे(१) उंड्री(१) निवडे(१) पोर्ले/ठाणे(२७) वारनूळ(१) पोहळे/बोरगाव(४) पोहळवाडी(२) कणेरी(१) तेलवे(३)मोहरे(२) धबधबेवाडी(१) नंणुद्रे(१) कोडोली(९) जेऊर(१) आवळी(२) पैजारवाडी(२) देवाळे(२)

एक ही हरकत न आलेल्या १६ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे..

केखले, माजनाळ, पुनळ, आंबर्डे, हरपवडे, कळे, म्हाळुंगे/बोरगाव, निकमवाडी, उत्रे, सोमवार
पेठ, नावली, सावर्डे/ सातवे, सातवे, दिगवडे, तिरपण, पोंबरे