मोठी बातमी : विधिमंडळ अधिवेशन गुंडाळलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज गुंडाळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळ अधिवेशन गुंडाळण्याच्या विचारावर एकमताने निर्णय झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या विधिमंडळ अधिवेशनाच्या स्थगितीसाठी निवेदन सादर केले त्यानंतर विरोधकांनीही त्याला पाठिंबा देत यावर सहमती दिली.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळ अधिवेशन गुंडाळण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ नये हा यामागचा हेतू आहे.
अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार हे मुंबईत विधानभवन परिसरात असतात. यामुळे सुरक्षेवर अतिरीक्त ताण येतो. म्हणूनच याबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत सर्व नेत्यांशी चर्चा करून अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सर्व VIP एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदर विधानभवन परिसर हा सर्वात अधिक संवेदनशील होतो. त्यामुळे अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेतला गेला आहे.
परंतु या अधिवेशन गुंडाळण्याचा हा निर्णय घेण्यापूर्वीच या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “अधिवेशन गुंडाळणे म्हणणे पळपुटेपणा आहे. अधिवेशन संस्थगित करायला आमचा विरोध आहे. एकीकडे अॅप उद्घाटन सुरू आहे, सभा सुरू आहेत ,मोदी फिरतात त्यांना संरक्षण लागत नाही का ? हे नाटक बंद करा” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. इतकेच नाही तर, आपला विंग कमांडर तिकडे पाकिस्तानात आहे आणि आपण पळपुटेपणा करतो, असेही ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद 

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य 

‘त्या’मुळे आजच गुंडाळणार अर्थसंकल्पीय अधिवेशन ?