Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | शार्प यू-टर्न! शिवतारे म्हणाले, सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vijay Shivtare On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) दंड थोपटलेले शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Shivsena) नेते विजय शिवतारे यांनी अखेर ‘पुरंदरचा तह’ करत बारामतीमधून माघार घेतल्याचे जाहीर केले. आज सासवडमध्ये एका सभेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी आपण बारामतीच्या रणांगणातून माघार का घेतली याचे कारण सांगितले. शिवाय सुनेत्रा वहिनींना (Sunetra Pawar) बहुमताने निवडून आणण्याची घोषणा देखील केली.(Vijay Shivtare On Baramati Lok Sabha)

अजित पवारांना प्रचंड गुर्मी, बारामतीत लोकशाहीसाठी लढणार, मतदारसंघात साडेपाच लाख पवारविरोधी मतदान, त्यांच्यासाठी मी निवडणूक लढवणार, बारामतीचा सातबारा पवारांच्या नावावर आहे का? असे म्हणणारे विजय शिवतारे अखेर जमिनीवर आल्याचे आज सासवडमधील त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले.

विजय शिवतारे म्हणाले, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील. पण आज मोठे ध्येय साधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळे बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचे काम करावे, असा ठराव आज आम्ही केला.

मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीच्या एका फोनमुळे मी निवडणुकीतून माघार घेतली. मुख्यमंत्र्यांना अडचण होऊ नये, म्हणून माघार घेतली, असे शिवतारे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना