ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ग्रंथालय संचालनालयामार्फत सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन जून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L,B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc0d6e94-b04c-11e8-ad95-99397a4ae8fc’]

राज्यातील २९ जिल्हास्तरीय केंद्रांमधून एकूण १ हजार १७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८६० विद्यार्थी उत्तीर्ण आणि ३१७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी ७३.०७ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक निकाल गोंदिया केंद्राचा ९७.५६ टक्के असून सर्वात कमी निकाल सांगली केंद्राचा ३६.३६ टक्के आहे. तर विभागामध्ये अमरावती विभागाचा सर्वाधिक ८५.७१ टक्के आणि औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी ६७.७५ टक्के निकाल लागला आहे.

परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रावर १५ सप्टेंबर नंतर मिळणार आहेत.
[amazon_link asins=’B075FY4RWK,B075BCSFNN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2bc8ded-b04c-11e8-81b4-2312b08f7669′]

ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुल्क आणि अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे २५ सप्टेंबरपर्यंत पाठवावेत. वर्ग व्यवस्थापकांनी फेर गुणमोजणीचे विद्यार्थ्यांचे अर्ज आणि चलनाची प्रत ग्रंथालय संचालनालयाकडे ५ ऑक्टोबर पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यानंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालकासह ‘त्यांना’ बडतर्फ करा
तहसिल कार्यालयातील लिपीकाला दोन हजारांची लाच घेताना पकडले
ताज्या खात्रीशीर अचूक आणि Breaking News साठी आताच डाउनलोड करा