LIC च्या या प्लानमध्ये रोज 73 रुपये जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा पूर्ण 10 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : LIC | भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) सर्व गटातील लोकांसाठी योजना लाँच करते. अशीच एक पॉलिसी एलआयसीने मध्यमवर्गीय कुटुंबासाठी लाँच केली होती. ज्यामध्ये तुम्ही दररोज 73 रुपये जमा करून मॅच्युरिटीपर्यंत 10 लाख रुपयांपर्यंतचा निधी जमवू शकता. तुम्हालाही अशा छोट्या पॉलिसीमध्ये रस असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण आम्ही तुम्हाला न्यू जीवन आनंद पॉलिसी (New Jeevan Anand Policy) बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही छोट्या गुंतवणुकीत मोठी रक्कम जमवू शकता. (LIC)

पॉलिसीमध्ये दुहेरी लाभ –

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नवीन जीवन आनंद पॉलिसी (New Jeevan Anand Policy) मध्ये, मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळतात. याशिवाय यामध्ये तुम्हाला आजीवन डेथ कव्हर मिळते. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये 10 लाख रुपयांचा निधी जमा करण्यासाठी तुम्हाला दररोज 73 रुपये गुंतवावे लागतील. (LIC)

पॉलिसीमध्ये कर सवलत –

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये, तुम्हाला चांगल्या फंडसह डेथ कव्हर मिळते. यासोबतच पॉलिसीमध्ये प्राप्तीकर सूटही मिळते. एलआसीच्या या पॉलिसीमध्ये, प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत लाभ उपलब्ध आहे.

हे करू शकतात पॉलिसीत गुंतवणूक –

या एलआयसी पॉलिसीमध्ये किमान वयाच्या 18 वर्षापासून गुंतवणूक करता येते आणि कमाल वयाच्या 50 वर्षापर्यंत आहे. पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे जो 35 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. पॉलिसीमध्ये, तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

असे मिळतील 10 लाख रुपये –

जर तुम्ही ही पॉलिसी 24 वर्षे वयात 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह खरेदी केली तर तुम्हाला वार्षिक सुमारे
26815 रुपये जमा करावे लागतील.
जर एका दिवसाच्या आधारावर पाहिले तर ते दररोज सुमारे 73.50 रुपये असेल.
समजा तुम्ही 21 वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल, तर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 5.63 लाख असेल,
ज्यामध्ये मॅच्युरिटीच्या वेळी बोनससह 10 लाख रुपयांहून अधिक मिळतील.

Web Title :-  LIC | get full rs ten lakh on maturity by depositing rs 73 daily in this plan of lic know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weight Loss Drink | वजन कंट्रोल करते नारळ पाणी, जाणून घ्या आरोग्याला कसा होता फायदा

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Moto Vault | मोटो व्हॉल्टच्या  पहिल्या शोरूमचे पुणे येथे उद्घाटन