मोदी सरकार LIC बाबत घेणार मोठा निर्णय ! मेगा IPO संदर्भातील हालचालींना वेग

नवी दिल्ली : वृत्त संस्था – LIC चा मेगा आयपीओ प्रस्तावित आहे. त्या संदर्भातल्या हालचाली वाढल्या आहेत. केंद्र सरकार त्यासाठी जून महिन्यातच इन्व्हेस्टमेंट बँकर्स (Investment Bankers) कडून प्रस्ताव मागवण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांच्या आधारे एलआयसी (LIC)  आयपीओच्या संचालनासाठी इन्व्हेस्टमेंट बँकर्सची नियुक्ती केली जाणार आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, याच महिन्यात केंद्र सरकार इन्व्हेस्टमेंट बँकर्स (Investment Bankers )कडून प्रस्ताव मागवू शकते. तसेच येत्या काही आठवड्यात LIC च्या शेअर्सच्या विक्रीसाठी सरकार आमंत्रण पाठवण्याची शक्यता आहे. तसेच मार्च 2022 पर्यंत एलआयसीचा आयपीओ येऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली आहे.

एलआयसीच्या समभागांच्या विक्रीवरून केंद्र सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaharaman) यांनी 2020-21चे अंदाजपत्रक सादर करताना LIC IPO ची घोषणा केली होती.
LIC सह एअर इंडिया अन् बीपीसीएल या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या दृष्टीनेही केंद्र सरकार पुढची पावल उचलणार असल्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाकांक्षी निर्गुंतवणूक योजनेद्वारे 24 अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे.
या निधीमुळे कोरोना संकटात खर्च वाढलेल्या सरकारला आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.
LIC च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20 मध्ये LIC ची एकूण अनुमानित संपत्ती 32 लाख कोटी रुपये अर्थात 439 अब्ज डॉलर एवढी आहे.
भारतीय बाजारपेठेतला एलआयसीचा हिस्सा जवळपास 70 टक्के आहे.

Mucormycosis : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय ! खासगी रूग्णालयांना आणखी एक दणका

डिस्चार्ज मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणाला पुन्हा कोरोनाची लागण, धारुर आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस

हे ही वाचा

 

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लोक आता आरोग्य आणि जीवन विमा (Insurance) याबद्दल अधिक सावध सावध झाले आहेत त्याला कारण कोरोना महामारी.
केंद्र सरकारही सामान्य लोकांना आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी (Insurance)  देण्यास सतर्क असल्याचे दिसून येत आहे.
जे संघटित क्षेत्रात नोकरी करत नाहीत अशा लोकांचा समावेश सामान्य माणसाच्या कक्षेत करण्यात आला आहे.
अशा लोकांसाठी भारतीय जीवन विमा महामंडळाने ( LIC Policy ) आम आदमी विमा योजना (Aam Aadmi Bima Yojana) आणली आहे.
ॲक्सिडेंटल डेथ (अपघाती मृत्यू) कव्हरेजशिवाय आजीवन पॉलिसी देखील उपलब्ध आहे.