LIC Jeevan Akshay : एकदाच पैसे भरा अन् 12 हजारांपर्यंत मिळवा पेन्शन; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या विम्याचे अनेक प्लॅन्स उपलब्ध असून, आपल्याला परवडणारे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत. तसेच जर तुम्ही स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी दरमहा पेन्शन मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठीही LIC ची विमा पॉलिसी आहे. ‘जीवन अक्षय’ असे या पॉलिसीचे नाव. हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही एकदाच काही ठराविक रक्कम भरल्यास त्यातून तुम्हाला पैसे कमावता येतील.

LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीअंतर्गत, तुम्हाला किमान 12 हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळू शकते. या पॉलिसीनुसार, कमाल मर्यादा नाही. मात्र, तुम्हाला किमान एक लाख रुपयाची एकरकमी गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये कुटुंबातील कोणतेही दोन सदस्य त्यामध्ये संयुक्त एन्युइटी घेऊ शकतात. या पॉलिसीमध्ये एकूण 10 पर्याय आहेत. वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही किंवा मासिक तत्त्वावर ही पेन्शन घेता येऊ शकते.

तसेच जर तुम्हाला दरमहा 6 हजार रुपये पेन्शन घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 9,16,200 रुपये एकरकमी जमा करावी लागेल. तसेच ‘A’ निवृत्तीवेतनाचा पर्याय दरमहा निवडला जाईल. असे केल्याने तुम्हाला 86,265 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. अर्धवार्षिक म्हणून घ्यायचे असेल तर पेन्शन 42,000 रुपये होईल. तिमाही पेन्शन 20745 असेल आणि मासिक पेन्शन 6,859 रुपये असेल. या योजनेंतर्गत तुम्हाला हमी दिलेली पेन्शन मिळणार आहे. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एकदाच पैसे द्यावे लागतात.

आणखी वैशिष्ट्ये काय?

30 ते 85 वर्षे वयोगटातील व्यक्ती पॉलिसी घेऊ शकते.

किमान 1 लाख रुपयाची गुंतवणूक आवश्यक

योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने

पॉलिसीधारकाच्या आयुष्यापर्यंत योजनेचा लाभ उपलब्ध

पॉलिसी जारी झाल्यापासून 3 महिन्यानंतर कर्ज सुविधा