सर्व LIC धारकांसाठी महत्वाची सूचना! KYC करण्यापूर्वी वाचा ही बातमी, विमा कंपनीने जारी केली नोटीस

नवी दिल्ली : तुम्हीही LIC पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) आपल्या करोडो ग्राहकांना एक मेसेज पाठवत आहे. मेसेजमध्ये ग्राहकांना केवायसी (KYC) व्हेरिफिकेशनबाबत इशारा देण्यात आला आहे. कारण, सायबर गुन्हेगारांनी एलआयसी ग्राहकांना केवायसी तात्काळ अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये दिलेल्या लिंकद्वारे त्वरित केवायसी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

या मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की केवायसी अपडेट न केल्यास एलआयसीकडून भारी शुल्क आकारले जाईल. हे टाळण्यासाठी विमा कंपनी ग्राहकांना एसएमएस (SMS) पाठवून फसवणूक कशी टाळायची तेही सांगत आहे.

LIC ने जारी केली नोटीस
विमा कंपनीने ही बातमी खोटी ठरवत नोटीस जारी केली आहे. एलआयसीने म्हटले आहे की कंपनी पॉलिसीधारकांना चांगल्या सेवेसाठी KYC अपडेट करण्यास सांगते, परंतु तसे न केल्यास दंड आकारला जात नाही.

विमा कंपनीने म्हटले आहे की, फसवणूक करणाऱ्यांना तुमचे वैयक्तिक/बँक तपशील देऊ नका आणि
कोणत्याही संशयास्पद/लिंकवर क्लिक करू नका. आमची अधिकृत वेबसाइट https://licindia.in ला भेट द्या. ‘LIC Customer’ अ‍ॅप डाउनलोड करा. एलआयसी अधिकृत कॉल सेंटरसाठी ०२२-६८२७ ६८२७ डायल करा.

Web Title :- LIC | lic notice for policy holders fake information with regard to penalty charges for kyc update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा