LIC Policy | LIC ची ही योजना काही वर्षांतच बनवते लखपती, मॅच्युरिटीनंतर मिळतील २८ लाख रुपये

नवी दिल्ली : LIC Policy | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विमा योजना (Insurance Scheme) ऑफर करते. यामध्ये सुरक्षेसोबतच गुंतवणुकीचे पर्यायही उपलब्ध आहेत आणि मॅच्युरिटीनंतर चांगली रक्कम दिली जाते. एलआयसीच्या (LIC Policy) जीवन प्रगती विमा योजनेबाबत (LIC Jeevan Pragti Plan) जाणून घेवूया.

भारतीय आयुर्विमा महामंडळाची जीवन प्रगती विमा योजना (LIC Jeevan Pragti Bima Yojana) तुम्हाला काही वर्षांत लखपती बनवू शकते. यामध्ये, दररोज २०० रुपये जमा करून, तुम्ही मॅच्युरिटीवर २८ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जीवन प्रगती योजना खरेदी करू शकता.

किती वर्षात मिळतील २८ लाख
LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेत गुंतवणूक करून लोकांना लाईफटाइम संरक्षण दिले जाते. तसेच, दररोज २०० रुपये गुंतवल्यास या योजनेअंतर्गत एका महिन्यात ६,००० रुपये जमा होतील. म्हणजे वर्षाला ७२ हजार रुपये जमा होतील. त्यानंतर २० वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेत बोनससह २८ लाख रुपये मिळतील. (LIC Policy)

पाच वर्षांत वाढते रिस्क कव्हर
या विमा योजनेतील रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढते. याचा अर्थ दर पाच वर्षांनी विम्याची रक्कम वाढेल.
डेथ बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, बोनस आणि विमा रक्कम कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते.

जीवन प्रगती विमा योजनेचे नियम
LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत किमान मुदत १२ आणि २० वर्षे आहे. १२ ते ४५ वर्षे वयोगटातील लोक
ही विमा योजना खरेदी करू शकतात. या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम तिमाही,
सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा करता येते. किमान विमा रक्कम १.५ लाख आणि कमाल मर्यादा नाही.

विमा संरक्षण कसे मिळेल
जर कोणी या योजनेत २ लाख रुपयांचा विमा घेतला असेल तर पाच वर्षांनी तो २.५ लाख रुपये होईल.
त्यानंतर १० ते १५ वर्षांपर्यंत ही रक्कम तीन लाख रुपये आणि २० वर्षांत ही रक्कम ३.५ लाख रुपये होईल.

Web Title :-  LIC Policy | lic jeevan pragati plan give rs 28 lakh on maturity just invest of rs 200 per day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारचा अनोखा अंदाज पाहून ट्विंकल खन्नाने केले ट्रोल

Ashish Shelar | ‘काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा