Ashish Shelar | ‘काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, आशिष शेलारांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन (Umesh Kolhe Murder Case) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्यात आलं, कारवाई करु नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह (Police Commissioner Arti Singh) यांना फोन केला होता, असा दावा राणा यांनी केला. यावरुन भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

काय म्हटलं आशिष शेलारांनी?

उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विट करुन डिवचलं आहे. आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला (Mehek Prabhu) जे क्लीनचीट देतात… उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात??? त्यांना श्रद्धा वालकरच्या (Shraddha Walker) निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये..? काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावे की नाही? असं ट्विट शेलार यांनी केलं आहे. आता यावरुन पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटात (Thackeray Group) वाद पेटण्याची शक्यता आहे.

रवी राणांनी काय केला होता आरोप?

उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्यात आले, कारवाई करु नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांना फोन केला होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच या प्रकरणाचा तपास चोरीच्या दिशेनं गेला.
त्यामुळे या प्रकरणात पोलीस आयुक्तांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
यावरुनच आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Web Title :-Ashish Shelar | ashish shelar once again criticizes uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Devendra Fadnavis | … तर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल, अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपांची फडणवीसांकडून गंभीर दखल