LIC Saral Pension | दर महिना मिळेल 12000 रूपये पेन्शन, केवळ एकदाच जमा करावे लागतील पैसे; मोदी सरकार देतंय गॅरंटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Saral Pension | जर तुम्ही सुद्धा पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (Life Insurance Corporation of India) सरल पेन्शन योजना (Saral Pension Scheme) चांगला पर्याय होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला दर महिना 12000 रूपये पेन्शन मिळते. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम द्यायचा आहे आणि त्यानंतर 60 वर्षानंतर दर महिना 12000 रुपये पेन्शन मिळेल. या पेन्शनचे पैसे तुम्हाला आयुष्यभर मिळतील. सरल पेन्शन योजनेचे फायदे जाणून घेवूयात. (LIC Saral Pension)

 

एलआयसी सरल पेन्शन योजनेचे नियम (Rules of LIC Saral Pension Scheme)

लाईफ एन्युटी विथ 100 पर्सेंट रिटर्न ऑफ पर्चेस (Life annuity with 100% return of purchase) – लाईफ एन्युटी विथ 100 पर्सेंट रिटर्न ऑफ पर्चेस प्राईस ही पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी संबंधीत असेल. पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत असेल, त्यांला पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

 

पेन्शन योजनेचे फायदे (Life annuity with 100% return of purchase)

पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जाते. यामध्ये पेन्शन पती-पत्नी दोघांना मिळते. यामध्ये पती किंवा पत्नी जो कुणी दिर्घकाळ जिवंत राहील, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही राहणार नाहीत तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल. (LIC Saral Pension)

 

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये (Features of a saral pension plan)

1. विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्यांची पेन्शन सुरू होईल.

2. हे तुमच्यावर अवलंबून असेल की पेन्शन दर महिना पाहिजे की तिमाही, सहामाही किंवा वार्षिक. हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.

3. ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेता येते.

4. या योजनेत 12000 रुपये वार्षिक किमान गुंतवावे लागतील. यामध्ये मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटची कोणतीही मर्यादा नाही.

5. ही योजना 40 ते 80 वयाच्या लोकांसाठी आहे.

6. या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कोणत्याही वेळी कर्ज मिळेल.

 

Web Title :- LIC Saral Pension | saral pension yojna lic saral pension will give rupees 12000 pension know how much money invest pm modi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा