खुशखबर ! मुला-मुलींना ‘लखपती’ बनवण्यासाठी LICची ‘ही’ पॉलिसी ‘उत्‍तम’, केवळ 206 रूपयांमध्ये 27 लाख, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जर आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंता असेल तर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ने ही समस्या सोडविण्यासाठी बाजारात एक योजना आणली आहे, जिचा लाभ घेऊन आपण आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करू शकता. LIC ने मुलांच्या भविष्याचा विचार करून बाजारात ‘न्यू चिल्ड्रन मनी बँक प्लॅन ८३२’ हा प्लॅन आणला आहे ज्यामध्ये तुम्हाला २०६ रुपये प्रतिदिन याप्रमाणे पैसे भरून २७ लाख रुपयांचा लाभ मिळवू शकाल.

हा प्लॅन मुलांच्या शिक्षणासाठी देखील उपयुक्त असून वाढत्या महागाईच्या काळात वरदान ठरू शकतो. यामुळे तुमच्या मुलांचे भविष्य सावरू शकणार असून त्यांची स्वप्ने पूर्ण होण्याला देखील हातभार लागणार आहे.

जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर –

या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रतिदिन २०६ रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. १ वर्षाच्या मुलापासून १२ वर्षांच्या मुलापर्यंत तुम्ही ही पॉलिसी विकत घेऊ शकता. मुलाचे वय २५ वर्ष झाल्यानंतर तुम्हाला या पॉलिसीचे २७ लाख रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या मुलाचे वय १२ वर्षे असेल तर १३ वर्षांसाठी आणि मुलाचे वय ५ वर्षे असेल तर २०वर्षांसाठी तुम्ही पॉलिसी विकत घेऊ शकता.

पॉलिसीचे पैसे तुम्ही ४ टप्प्यांच्या प्रकाराद्वारे भरू शकता. १ वर्ष, ६ महिने, ३ महिने, १ महिना असे चार प्रकार आहेत.

१ वर्षांचा हप्ता : ७७,३३४ रुपये

६ महिन्यांचा हप्ता : ३९,०८६ रुपये

३ महिन्यांचा हप्ता : १९,७५० रुपये

१ महिन्यांचा हप्ता : ६,५८४ रुपये

मॅच्युरिटी नंतर मिळणार हा लाभ :

बोनस : ११,७६,००० रुपये

अ‍ॅडि‍शनल बोनस : ९८,००० रुपये

४०% सम अस्‍योर्ड : ५,६०,००० रुपये

एकूण रक्कम : १८,३४,००० रुपये

याशिवाय ८,४०,००० रुपये मनी बॅक द्वारे तुमच्या खात्यात जमा होतील. अशाप्रकारे तुम्हाला एकूण २६,७४,००० रुपयांचा लाभ होईल.

आरोग्यविषयक वृत्त