मोहरीचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाकघरात मोहरीला किती महत्त्व आहे हे कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. फोडणीसाठी कढीपत्त्यासोबत याचा आवर्जून वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवणाऱ्या या मोहरीचे आपल्या शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आज आपण याच्या काही आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) मोहरीचं तेल हे उष्ण आहे. अनेकजण हिवाळ्यात याच तेलाचा वापर करतात. अर्धांगवायू, संधिवात, आमवात, सायटीका, खांदा जखडणं, मान, गडघ्याचे विकार या सगळ्या वातविकारात मोहरीचं तेल किंवा मोहरी वाटून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावावा. परंतु मोहरीचं तेलं उष्ण असल्यानं अनेकांना ते सोसवत नाही. अशावेळी अन्य एखादं तेल मिक्स करून ते वापरावं.

2) तीळ तेल, एरंडेल तेल, लिंबोणी तेल, करंजेल तेल यांच्या जोडीला मोहरी तेलाच्या मदतीमुळं अभ्यंगार्थ महानारायण तेल तया केलं जातं.

3) अनेक उपचार करूनही सर्दीला आराम नसेल मिळत तर मोहरीची चिमूटभर पूड मधासोबत खावी.

4) कोणताही विषारी पदार्थ पोटात गेला तर मोहरीचं पाणी प्यावं. मोहरीचं पाणी पिल्यानं पटकन उलटी होते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकला जातो.

5) छातीत कफ झाला असेल तर मोहरी आणि मीठ यांचा काढा प्यावा. काढा पिल्यानंतर उलटी होते. यानंतर छातीत जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. परंतु हा उपयोग केवळ तरुण व्यक्तींनीच करावा. लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती यांनी हा प्रयोग करू नये.

6) जंत किंवा कृमी सहजपणे पडत नसेल तर मोहरीचीच चिमूटभर पूड तीन दिवस घ्यावी. जंत नाहीसे होतात.

7) पोटदुखी, डोकेदुखी यासाठी मोहरी वाटून त्या त्या अवयवांवर लेप लावावा.

8) लघवी साफ होण्यासाठी ओटीपोटीवर लेप लावावा.

9) पोटफुगी, अन्नपचन, अजीर्ण यासाठी मोहरी चूर्ण आल्याच्या रसासोबत घ्यावं. मोहरी खूप उष्ण आहे. याचं कायम भान ठेवावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.