Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

पोलीसनामा ऑनलाईन : Lingayat Vadhu Var | महात्मा बसवेश्वर वधुवर सुचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीने 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत पुण्यातील सारसबागेजवळ वेदशास्त्रोतेजक सभा, सदाशिव पेठ येथे राजस्तरीय लिंगायत वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (Lingayat Vadhu Var)

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शरण राजेंद्र आलमखाने – महात्मा बसवेश्वर नाट्यनिर्माते , शरण रमेशजी कोरे – उद्योजक , स्वप्नील खडके – उपाधक्ष कै भिकुबाई मेनकुदळे पंचम ट्रस्ट पुणे , शरण सतिशकुमार पाटील – जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बसवदल पुणे, निळकंठ पाटील – शरण साहित्य अभ्यासक , संतोष मलशेटटी, नंदिनी पाटील (जेष्ठ पत्रकार पुणे), राजकुमार कलशेटी (उदयोजक), शरण रवींद्र खुबा (बसव सेवा प्रतिष्ठान पुणे ) यांची उपस्थिती असणार आहे. (Lingayat Vadhu Var)

या राज्यस्तरीय लिंगायत वधुवर परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत, माळी तेली कुंभार कोष्टी गवळी दिक्षांवत शिलवंत जंगम आदीसह सर्व पोटजातीतील वधुवर पालक उपस्थित राहणार आहेत सदर मेळाव्यात उपस्थित वधुवर यांना संस्थेच्य वतीने वधुवर माहिती पुस्तिका भेट देण्यात येणार आहे.

संस्थेच्या वतीने पुढील मेळावे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बेळगाव येथे होणार असून तरी या सर्व मेळाव्याचे माहिती
पुणे येथे येऊन नोंद करणाऱ्या वधुवर यांना होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने आप्पासाहेब शेगावे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी शेगावे यांच्याशी 99751 85511 या नंबरवर संपर्क साधावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

Shiv Sena Thackeray Group | शिवसेना ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा, ”मतदान आटोपताच दरवाढ… ही मोदी सरकारची हातचलाखी”

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा