Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

मुंबई : Jitendra Awhad On Ajit Pawar | सत्ताधारी भाजपासोबत (BJP) जाण्याचे ठरल्यावर आम्ही त्यासाठी शरद पवारांची (NCP Chief Sharad Pawar) दोन वेळा भेट घेतली. पण ते मुद्दाम विलंब करत वेगळेच राजकारण करत राहिले, अशा प्रकारचे आरोप अजित पवार यांनी आज कर्जत येथे पक्षाच्या शिबिरात बोलताना केले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार यांच्यावर आरोप (Jitendra Awhad On Ajit Pawar) करत जाब विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना सवाल करताना म्हटले की, पक्षाची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रातील लहान पोरं देखील याचे उत्तर सांगतील की, शरद पवारांनी केली. घड्याळ देशभरात कुणी नेले? ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आमदार होते ते कुणामुळे होते? शरदचंद्र सिन्हांसारखा काँग्रेसचा (Congress) वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळे मिळाले होते?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्हाला ५ जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरावा वाटला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत आहेत, असे म्हणायचा आणि आज शरद पवारांवर एवढ्या गोळ्या घालण्याचे कारण काय? आणि कुणी गोळ्या झाडाव्यात.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad On Ajit Pawar) म्हणाले, शरद पवारांना संपवण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे.
कारण ते काय जादूगार आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे १९९३ साली शरद पवार काय म्हणाले होते, १९९६ साली
शरद पवार काय म्हणाले होते हे कशासाठी काढत आहात.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझी आणि जयंत पाटलांची (Jayant Patil) बैठक झाली नव्हती, कुठे झाली होती,
काय पुरावे आहेत? मी तुमचा पुरावा देतो, तुम्ही कुठल्या फ्लाइटने कधी दिल्लीला गेलात.
त्या फ्लाइटचा व्हीटी नंबर सगळे देतो. रात्रीच्या अंधारातच तुम्हाला कशाला दिल्लीला जायचे होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे, यांनी शरद पवारांवर टीका केली नसती
तर त्यांची भाषण राज्यभरात गेली असती का? शरद पवारांवर तुटून पडणार असाल तर आम्ही देखील योद्ध्याप्रमाणे लढू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल