पत्नीला उचलून नेण्याची जागतिक शर्यत, विजेत्या जोडप्याला ‘हे’ बक्षिस

सोनकाजर्वी (फिनलंड) : वृत्तसंस्था – अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘जोर लगाके हैशा’ हा चित्रपट पाहिला आहे का तुम्ही? या चित्रपटात एक शर्यत दाखण्यात आली होती. ती पत्नीला खांद्यावर उचलून ठराविक अंतर पार करायची. या शर्यतीत अडथळे असतात. ही शर्यत फक्त सिनेमा पुरतीच नव्हती, तर जागतिक स्थरावर अशी शर्यत आहे. जागतिक ‘वाईफ कॅरिंग चॅम्पियनशीप’ असं या शर्यतीचे नाव आहे. यंदा ही शर्यत फिनलंडमध्ये भरवली गेली. यात लिथुएनिया या दक्षिण युरोपीय देशातील जोडप्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. विजेत्या जोडप्याला पत्नीच्या वजनाइतकी बिअर बक्षिस म्हणून मिळाली आहे.

विजेत्या जोडप्याने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. वाईफ कॅरिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीमध्ये २४ स्पर्धक जोडप्यांची निवड झाली होती. वैतौटस किर्कीऔस्कस आणि त्याची पत्नी नेरिंगा किर्कीओस्कीन अस या विजेत्या जोडीचे नाव आहे. ही शर्यत २५३.५ मीटरची असून यात अनेक अडथळे असतात. त्यांनी केवळ एक मिनिट सहा सेकंदाच्या कालावधीत पूर्ण केली.

ही स्पर्धा गेल्या २४ वर्षांपासून सुरु आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या या युएस, ऑस्ट्रेलिया, पोलंड आणि ब्रिटनमध्ये पार पडल्या होत्या. फिनलंडमधील सोनकाजर्वी शहरात शनिवारी स्पर्धेची अंतिम फेरी झाली, अनेक पर्यटकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला.

दरम्यान, स्पर्धेची गंमत अशी की या स्पर्धेतील विजेत्यांना पत्नीच्या बजनाइतकी बिअर मिळते. त्यासाठी काही नवरे त्यांच्या पत्नींना वजनदार बनवत असतील, पण शर्यत जिंकण्यासाठी याच वजनाला खांद्यावर घेऊन त्यांना पळायचे असते. त्यामुळे नवरेमंडळी काय करत असतील हे त्यांनाच माहित.

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई