जर तुमचा Credit Score शून्य असेल, तरी सुद्धा तुम्हाला मिळू शकते Loan, जाणून घ्या कसे होईल हे शक्य

नवी दिल्ली : सिबिल एक प्रमुख क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो आहे आणि अशाप्रकारे ‘CIBIL‘ शब्द क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट ब्यूरोला पर्याय बनला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो वित्त संस्थानी दिलेल्या डेटाच्या आधारावर कर्जदाराच्या क्रेडिट ट्रांजक्शन्सची हिस्ट्री संग्रहित करते. सिबिल स्कोर 300 ते 900 च्या दरम्यानचा एक क्रमांक असतो, जो वित्त संस्थेसोबत तुमच्या व्यवहारांवर आधारित असतो.

सिबिल स्कोर जेवढा उच्च असतो, तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता तेवढी जास्त वाढते. अटी सुद्धा तेवढ्या सोप्या होतात. मात्र, जर तुम्ही अगोदर कोणते कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतलेले नसेल तर क्रेडिट स्कोर शून्य होऊ शकतो. जर क्रेडिट ब्यूरोकडे उपलब्ध तुमची क्रेडिट हिस्ट्री सहा महिन्याच्या कमी काळाची आहे, तर तुमचा क्रेडिट स्कोर -1 सुद्धा होऊ शकतो. नवीन कर्जदारासाठी सिबिल एक ते पाचच्या दरम्यान स्कोर देते. स्कोर कमी असल्यास कर्ज देणार्‍या संस्थेच्या दृष्टीकोणातून तुम्हाला कर्ज देण्याची जोखिम वाढते.

टॅक्स आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन सांगतात की, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो 2005 च्या नंतर अस्तित्वात आले आहे, परंतु बँका अनेक दशकांपासून कर्ज देत आहेत. यासाठी जर कर्जदाराकडे कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसेल तरी सुद्धा होम लोन मिळू शकते आणि या स्थितीत कर्जदाता होम लोन देण्यासाठी कर्जदाराची पात्रता ठरवण्यासाठी काही अन्य मापदंडांचा वापर करू शकतो.

जैन यांच्यानुसार, अशा स्थितीत तुमची शैक्षणिक पात्रता आणि जॉब प्रोफाइल कर्जदात्याद्वारे वापरले जाणारे महत्वाचे मापदंड असतात. जर तुम्ही सरकारी नोकर, किंवा उच्चशिक्षित नसाल, तरी सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकते. अशा प्रकरणात कर्जदाता तुमची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी तुमच्याकडून मागील काही वर्षांचे बँक स्टेटमेंट मागू शकतो. जर यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (सीप) सारख्या गुंतवणुकीसाठी नियमित प्रकारे डेबिटची माहिती मिळाली तर यातून कर्जदाता तुमच्या बचतीच्या सवयीने आश्वस्त होऊ शकतो. बँक तुमच्या बँकिंग व्यवहाराची सविस्तर चौकशी सुद्धा करू शकते. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वीज किंवा मोबाइल बिलासारख्या युटिलिटी बिलांचा भरणा नियमित प्रकारे करता किंवा नाही हे पाहिले जाते

जर तुम्ही भाडेकरारावर राहात असाल तर ते तुमच्या भाडे भरण्याच्या नियमिततेविषयी सुद्धा व्हेरिफाय करू शकतात. तुमची खर्च आणि बचतीची सवय बँक स्टेटमेंटमधून समजू शकते. ज्याद्वारे समजू शकते की, तुम्ही वेळेत कर्ज चुकवण्यास सक्षम आहात किंवा नाही. बँक तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीची गॅरंटी देण्यासाठी सांगू शकते, ज्याची क्रेडिट हिस्ट्री आणि के्रडिट स्कोर चांगला असेल. हे असे काही वैकल्पिक मापदंड आहेत, ज्यांचा वापर नियमित क्रेडिट रिपोर्टच्या अभावात कर्जदात्याद्वारे केला जाऊ शकतो. मात्र, हे मापदंड परिपूर्ण नाहीत आणि प्रत्येक बँकेचे वेगवेगळे मापदंड असू शकतात.