Loan Scheme | शहरात घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्त लोन, सरकारी स्कीम कधी येणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : Loan Scheme | शहरांमध्ये राहणारी जी कुटुंबे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी केंद्र सरकार (Central Government) एक नवीन योजना आणत आहे आणि त्यांना स्वस्त दरात सरकारकडून कर्ज (Loan Scheme) मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या घोषणेनंतर जनतेला प्रतीक्षा होती की कधी या योजनेची तारीख आणि वेळ जाहीर होणार आहे (Cheap Loan Scheme).

हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केली वेळ
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी सांगितले की, गृहकर्जावरील (Home Loan) व्याजात सवलत देणारी योजना सप्टेंबरमध्ये आणली जाईल. हरदीप सिंग पुरी म्हणाले, या योजनेचा आराखडा सध्या तयार केला जात आहे.

सप्टेंबरमध्ये लाँच होईल स्कीम
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी सांगितले की, शहरांमध्ये घरे खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कर्जाच्या व्याजात सवलत देण्यासाठी ही योजना सप्टेंबरमध्ये सुरू केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात, शहरांमध्ये राहणाऱ्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक योजना जाहीर केली होती ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भाषणात म्हटले होते की, शहरांमधील जे लोक स्वतःच्या घराचे
स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी सरकार एक नवीन योजना आणत आहे. जे लोक शहरात भाड्याच्या घरात, झोपडपट्टीत,
चाळींमध्ये राहतात अशा लोकांना होम लोनच्या व्याजात लाखोंची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरांमधील मोठी लोकसंख्या अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहते, त्यांना स्वत:चे घर देण्यासाठी कर्जाच्या व्याजात
सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News |  50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात