Lockdown in Maharashtra : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासुन संपुर्ण राज्यात कडक निर्बंध(लॉकडाऊन)(Lockdown)घालण्यात आले होते. महाराष्ट्रात 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधजाहीर करण्यात आले होते. कडक निर्बंध आणखी काही दिवस लागू राहणार की निर्बंध शिथील होणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, कडक निर्बंध वाढविण्याबाबत अथवा शिथील करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन(Lockdown) सुरू राहणार असून त्यामध्ये काही प्रमाणावर शिथीलता देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढणार असून काही प्रमाणात सुट देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

1 जूननंतर देखील कडक निर्बंध लागू राहतील की नाही याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे टास्क फोर्सबरोबर चर्चा करून निर्णय जाहीर करतील असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, 1 जूननंतर लॉकडाऊन राहणार की नाही हा प्रश्न अद्यापतरी सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी कोरोनाची आकडेवारी पाहता खुप काही समाधानकारक बाब नाही असं सांगुन सरसकट लॉकडाऊन उठणार नाही असे स्पष्ट संकेत दिले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊन पुर्णपणे उठणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

Pune : मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या कोर्टात काय झालं

काँग्रेस नागरसेवकासह 19 जुगाऱ्यांना अटक !

Black Fungus & Mask : मास्कमुळे सुद्धा वाढत आहे का फंगस इन्फेक्शनचा धोका?, कसा बचाव करू शकता यापासून? 

सरकारमधील अंतर्गत कुरबुरीमुळे CM ठाकरे नाराज, म्हणाले – ‘सरकार टिकवण ही शिवसेनेचीच जबाबदारी नाही’