Lohegaon Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lohegaon Pune Crime News | अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिला किस करून तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) तरुणावर विनयभंग (Molestation Case) व पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.6) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोहगाव परिसरात घडला आहे. (Lohegaon Pune Crime News)

याबाबत 15 वर्षीय पिडीत मुलीने मंगळवारी (दि.7) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन महेश अंबादास चंद्रशेखर Mahesh Ambadas Chandrasekhar (वय-23) याच्यावर आयपीसी 354, 354(अ) 323, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलगी एका सोसायटीत राहतात. पिडीत मुलीचे आई-वडील घरी नसताना आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिला जवळ ओढले. तिला किस करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. मुलीने त्याच्या तावडीतून सुटून घरी पळून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन मारहाण केली. तसेच स्वत: आत्महत्या करण्याची धमकी (Threats to commit suicide) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नढे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’; मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

Murlidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर – मुरलीधर मोहोळ