Lohegaon Pune Crime | पुणे : मैत्रिणीसोबत ठेवले संबंध, अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर केला व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lohegaon Pune Crime | मैत्रीचा गैरफायदा घेऊन मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. शारीरिक संबंध ठेवाताना महिलेच्या नकळत मोबाईलमध्ये व्हिडीओ (Nude Video) काढून तो ऑनलाईन वेबसाईटवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सन 2018 ते एप्रिल 2024 या कालावधीत लोहगाव तसेच सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) घडला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 34 वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि.21) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन महेश हनुमंतराव टोटरे Mahesh Hanumantrao Totre (वय-27 रा. लोहगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 500, 509 सह आयटी अॅक्ट नुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत असून त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

आरोपीने मैत्रीचा गैरफायदा घेऊन फिर्य़ादी यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
मात्र याचा फायदा घेऊन आरोपीने महिलेच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत तयार केली.
ही चित्रफीत महिलेच्या संमतीशिवाय ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करुन व्हायरल करत महिलेची बदनामी केली.
तसेच आरोपीच्या मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

Baramati Lok Sabha | भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस