Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | पुणे शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या (Vehicle Theft) सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Records) गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोनच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक लाख 20 हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करुन हडपसर (Hadapsar Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील (Koregaon Park Police Station) तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई माळवाडी (Malwadi Hadapsar) येथील जुन्या कॅनॉलच्या बाजूला करण्यात आली. शाबीर असलम नदाफ Shabir Aslam Nadaf (वय 22, रा. बालाजी ट्रेडर्स समोर शिवशक्ती चौक भेकराईनगर, हडपसर, Bhekrai Nagar Hadapsar) असे अटक केलेल्या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे.(Pune Crime Branch)

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असतांना पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, अशोक आटोळे यांना माहिती मिळाली की, एक तरुण माळवाडी येथे जुन्या कॅनॉलच्या बाजुला नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीवर बसलेला आहे. ती चोरीची दुचाकी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. पथकाने सापळा रचून शाबीर नदाफ याला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला कार्यालयात आणुन गाडी बाबत अधिक माहिती घेतली असता त्याने सांगितले की, दुचाकी त्याने हडपसर भागातुन चोरी केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अजून 2 गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने तीन दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील कार्य़वाही करण्यासाठी आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(Amol Zende DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ सतिश गोवेकर (Satish Govekar ACP),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Sr PI Ajay Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अशोक आटोळे,
दत्तात्रेय खरपुडे, गिरमकर, गोसावी, सकपाळ, राजेश अभंग यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत