Lohegaon To Hadapsar PMPML Bus | लोहगाव ते हडपसर बससेवा सुरू ! आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lohegaon To Hadapsar PMPML Bus | लोहगाव ते हडपसर साठी नागरिकांना २ बस बदलून जावे लागत होते, नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता. अनेकवेळा तासनतास बस साठी उभे राहून ही हडपसर ला जाता येत नव्हते. नागरिकांनी आम आदमी पार्टीचे (Pune AAP) कार्यकर्ते फुलचंद म्हस्के, अविनाश भाकरे, अर्जुन साकोरे यांनी यासाठी पी एम पी एम एल कडे पाठपुरावा करून लोहगाव येथील नागरिकांसाठी ही बससेवा सुरू केली. (Lohegaon To Hadapsar PMPML Bus)

 

 

यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मुकुंद किर्दत यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले. बसचे चालक व कंडक्टर यांचा सत्कार फॅबियन अण्णा सॅमसंन यांनी केले. गणेश ढमाले, अमित म्हस्के, मनोज फुलावरे, तानाजी शेरखाने, अक्षय दावडीकर, सतीश यादव, संजय कोणे, गणेश मोरे, राजू परदेशी, साहील परदेशी, सीमा गुट्टे, तहसीन देसाई, प्रीती निकाळजे, संजय कटारनवरे, जोगिंदर पाल तुरा, बाळासाहेब चोखर, मिलिंद ओव्हाळ, चंद्रकांत गायकवाड, इमरान खान, दिलीप साळवे ,अविनाश वैरागर, दिपक सिंग व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आप च्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

 

Web Title : Lohegaon To Hadapsar PMPML Bus | Bus service from Lohgaon to Hadapsar started! Success to the efforts of Aam Aadmi Party workers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा